Hot Posts

6/recent/ticker-posts

मधुमेह (blood sugar ) नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय !

Dibeties : सध्याच्या धावपळीच्या जीवनात, अनियमित जीवनशैली, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे (bad lifestyle, stress) अनेक लोक विविध व्याधींनी ग्रासून (health problems) गेले आहेत. त्यापैकी सध्या महत्वाचे दोन व्याधींनी अनेकांना ग्रासले आहे ते म्हणजे मधुमेह (diabetes) आणि रक्त दाब ( blood Pressure). त्यापैकी मधुमेह म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे होणारा आजार. मधुमेह असणाऱ्या लोकांना सतत लघवी लागणे, जास्त भूक लागणे, घाम येणे, बेचैन वाटणे अशी अनेक लक्षणे दिसू शकतात. मधुमेह हा किडनी, हृदयरोग, लिव्हरशी संबंधित गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून सुरुवातीच्या स्टेजलाच मधुमेहाला नियंत्रित करता आले, तर तुम्हीअनेक आजारांपासून लांब राहू शकतो. म्हणून तुम्हाला सुद्धा मधुमेहाला नियंत्रित ठेवण्यासाठी नक्की काय करायचे, असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेलच? त्याचबरोबर कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे (sugar level) प्रमाण संतुलित राहते. याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे. त्यासाठी हा पुर्णपणे वाचा. 
मधुमेह (blood sugar ) नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय

शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी काय उपाय करावेत. ( How to control Dibeties in Marathi )

१) लसूण –

लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. लसणाचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी व शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सेवन करू शकतात. त्यासाठी लसणाच्या 2-3 पाकळ्या घेऊन, त्या सोलून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात. सकाळी रिकाम्या पोटी लसूण चावून खावे. त्यामुळे मधुमेहाला आळा बसतो. त्याचबरोबर लसणामुळे हाय कोलेस्ट्रॉलही कमी होण्यास मदत मिळते.

२) जांभूळाच्या बिया –

जांभूळाच्या बिया हा मधुमेहावरील एक उपाय आहे. बरेचसे लोक रक्तातील साखर वाढल्यानंतर घरगुती उपाय म्हणून जांभूळाच्या बियांचा वापर करताना दिसतात. मधुमेहाला आळा घालण्यासाठी तुम्ही जांभूळाच्या बियांचे सेवन करू शकता. त्यासाठी जांभूळाच्या बिया थोड्या वाळवून त्याची पावडर करून ठेवावी. रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह या पावडरीचे सेवन करावे.

हेही वाचा.. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय

३) कांदा – 

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा फायदेशीर मानला जातो. कांद्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की कांद्याचा अर्क रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतो. हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला होता. यामध्ये संशोधकांनी कांदा हे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय असल्याचे सांगितले आहे. कांद्यामध्ये असलेले घटक हाडांचे आरोग्य सुधारतात आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करतात.

४) कोरफड – 

एका संशोधनात असे आढळून आले आहे की कोरफडीचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. कोरफडीचे सेवन केल्याने ग्लायसेमिक नियंत्रणावर सकारात्मक परिणाम होतो. कोरफड हे वजन नियंत्रणासाठी देखील फायदेशीर मानले जाते. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. तुमची साखरेची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असली तरी कोरफडीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

हेही वाचा.. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता एका मिस कॉल वर !

) आवळा –

आवळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे आणि औषधी गुणधर्म असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. तसेच हायपोग्लायसेमिक गुणधर्मही असतात. त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल होऊ शकते. आवळ्याची पावडर कोमट पाण्यात मिसळून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. त्याचे रोज, नियमितपणे सेवन केल्यास मधुमेहाला आळा घालण्यास मदत होते.

तसेच कडुनिंब, कारलं, काकडी, दालचिनी, नाचणीचे पीठ आणि अंजीराची पाने खाल्यानेही मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांचे सेवन करावे

तर मित्रानो कसा वाटला आजचा आरोग्यविषयक मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे यासाठीच लेख. हा लेख आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.

 टीप- या लेखामध्ये देण्यात आलेले घरगुती उपाय व माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहेत. वरील उपाय करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या