Hot Posts

6/recent/ticker-posts

मीशो वर काम करून कमवा महिना 50 हजार पेक्षा जास्त

 नमस्कार मित्रानो आज तुम्हाला मीशो ॲप वरुन पैसे कसे कमवायचे याविषयी माहिती देणार आहोत. आजच्या काळात Amazon आणि Flipkart सारखे अनेकऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत, जे तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याच्या अनेक संधी देतात. 

मीशो ॲप वरुन पैसे कसे कमावयाचे

मित्रानो जर तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन मोबाईलवरून पैसे कमवायचे असतील, तर सध्या ट्रेण्ड मध्ये असलेले Meesho App हा तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय आहे. Meesho App हे ऑनलाईन शॉपिंग चे खूप लोकप्रिय ॲप आहे. या ॲपवरून सध्या 10 लाखाहून अधिक लोक पैसे कमवत आहेत. मित्रानो मीशो ॲप हे एक ऑनलाइन स्टोअर आहे. जे तुम्हाला चांगली उत्पादने अतिशय चांगल्या किमतीत उपलब्ध करून देते. जर तुम्ही मिशो मध्ये तुमचे खाते तयार केले आणि त्यांची उत्पादने विकली, तर तुम्हाला त्यासाठी कमिशन मिळते.

मित्रानो मीशोची सुरुवात 2015 मध्ये विद्युत आणि संजीव बनवाल यांनी केली होती. जे आयआयटी दिल्ली मधून पासआऊट झालेले विद्यार्थी आहेत. 2020 पर्यंत मीशो ॲपचे 20 लाखाहून अधिक यशस्वी उद्योजक तयार करणे हे या दोघांचे मुख्य उद्दिष्ट होते. 

हेही वाचा.. मोबाईल वरुन मिळवा एका दिवसात 5 लाख रुपये कर्ज

➡️ काय आहे मीशो ॲप 

मीशो ॲप हे भारतातील सर्वात मोठे पुनर्विक्री ॲप आहे ज्यात भारतातील सर्वात मोठ्या घाऊक कंपन्यांच्या उत्पादनांच्या सूची आहेत. तुम्हाला तेथे कमी किमतीत अनेक वस्तू मिळतात ज्याची पूनर्विक्री करून तुम्ही सहज पैसे कमवू शकता. मित्रानो सध्याच्या युगात ऑनलाइन खरेदी विक्री करणे खूपच सामान्य झाले आहे आणि प्रत्येकजण ऑनलाइन वस्तू खरेदी करतो, ज्या बाजारापेक्षा स्वस्त आहेत आणि त्यासाठी वाटाघाटी करण्याची गरज नाही, म्हणून लोक ऑनलाइन खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे आता अशा अनेक कंपन्या आल्या आहेत ज्या तुम्हाला Amazon, Flipkart इत्यादी वर मिळणाऱ्या वस्तूसारख्या अनेक वस्तू विकून खूप चांगले पैसे कमवण्याची संधी देत ​​आहेत. परंतु मित्रानो Meesho या सर्वांपेक्षा पेक्षा खूप चांगली आहे कारण यामध्ये तुम्ही कोणताही माल स्वतःच्या किमतीमध्ये विकू शकता आणि त्यामाध्यमातून नफा मिळवू शकता.


➡️ मिशो ॲप मधून पैसे कमावण्यासाठी काय करावे

सर्वप्रथम तुम्हाला मीशो ॲपमध्ये तुमचे खाते तयार करावे लागेल. यानंतर अशी काही उत्पादने निवडावी लागतील, जी ग्राहकांना आकर्षित करणारी असतील. त्यानंतर निवडलेली उत्पादने व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सर्व सोशल मीडियावर शेअर करावी लागतील. तुमच्याद्वारे शेअर केलेल्या लिंकवरून कोणी उत्पादन विकत घेतल्यास. तुम्हाला कमिशन मिळेल. ज्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकाल.


➡️ मीशो अँप कसे डाउनलोड करावे? (How to Download Meesho App in Marathi)

तुम्हाला मीशो अँप डाउनलोड करायचे असल्यास आणि त्याद्वारे पैसे कमवायचे असल्यास, तुम्ही प्रथम खालील स्टेप्स पूर्ण करणे आवश्यक आहे:

तुम्ही प्रथम गूगल प्ले स्टोअरवर जाऊन 

मीशो ॲप डाऊनलोड करा .

तुमच्या फोनवर, ते डाउनलोड व इंस्टॉल झाल्यानंतर

पुढील पायरी म्हणजे या अँपवर खाते तयार करावे.

येथे एक अतिशय सोपी साइन-अप प्रक्रिया आहे.

तुमचे खाते तयार झाल्यानंतर, तुम्ही तेथे दिलेल्या सूचीतील कोणत्याही उत्पादनाची पुनर्विक्री करू शकता.


➡️ तुम्ही खालील सोशल मीडिया मार्गाने मीशो ची उत्पादने विक्री करू शकाल

1. WhatsApp

तुम्ही Meesho App वरून वस्तू विकण्यासाठी WhatsApp वापरू शकता आणि ज्यांना ऑनलाइन खरेदी करायला आवडते अशा लोकांचा एक WhatsApp ग्रूप तयार करू शकता. त्यानंतर ग्रूप वरील लोकांना उपयुक्त अश्या किंवा आवडत्या वस्तू च्या लिंक खरेदीसाठी ग्रूप वर पाठवू शकता. त्याचबरोबर WhatsApp स्टेटसच्या मदतीने सुध्दा तुम्ही Meesho उत्पादने विकू शकता.


2 फेसबुक

Facebook च्या माध्यमातून तुम्ही Meesho App वरील उत्पादने अनेकांना विकू शकता कारण इथे तुम्हाला Facebook पेज, Facebook ग्रुप, Facebook स्टेटस यासारखे अनेक पर्याय मिळतात ज्याचा वापर करून तुम्ही Meesho उत्पादनाची जाहिरात करू शकता.

हेही वाचा.. हे चार स्टार्टअप व्यवसाय करा आणि महिना लाखों रूपये कमवा

3 इंस्टाग्राम

इंस्टाग्राम जवळजवळ प्रत्येकजण वापरत आहे आणि मीशो ॲप वरुन येथे सहजपणे जाहिरात केली जाऊ शकते कारण फेसबुक प्रमाणे येथे देखील तुम्हाला बरेच पर्याय मिळतात, ज्याच्या मदतीने तुम्ही मीशो ॲप मधील उत्पादनाची जाहिरात आणि विक्री करू शकता.


4. टेलिग्राम चॅनेल

टेलिग्राम चॅनल देखील व्हाट्सएप सारखेच आहे परंतु त्यात व्हॉट्सॲप पेक्षा चांगले फीचर्स आहेत, म्हणून जर तुम्हाला अधिकाधिक मीशो उत्पादने विकायची असतील तर टेलिग्राम हा खुप चांगला पर्याय आहे तो नक्किच वापरला पाहिजे.

तर मित्रानो मीशो ॲप वरुन पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला समजले असेलच. मित्रानो लेख आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या