Hot Posts

6/recent/ticker-posts

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ?

 मित्रानो सद्ध्या ट्रेडिंगसाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने लोक सहजपणे ट्रेडिंग करू शकतात. मोबाइल ॲप्सद्वारे ट्रेडिंग सुरू झाल्यामुळे भारतातही ट्रेडिंग चांगलेच लोकप्रिय होत आहे. अनेक लोक ट्रेडिंग मधून पैसे कमवून श्रीमंत होत आहेत.

पण मित्रानो जे लोक ट्रेडिंगमध्ये नवीन आहेत किंवा ट्रेडिंग शिकत आहेत. ज्यांना ट्रेडिंगबद्दल फारशी माहिती नाही. अशा लोकांसाठी Share market information in Marathi मध्ये घेऊन आलो आहोत

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ?

मित्रानो ट्रेडिंगचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी एक म्हणजे Intrady Treding.

 मित्रांनो तुम्हाला पैशाने पैसे कमवायचे असतील तर इंट्राडे ट्रेडिंग हा एक चांगला पर्याय असू शकतो.

ज्यांना इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, इंट्राडे ट्रेडिंग कसे केले जाते, इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे, इंट्राडे ट्रेडिंगमधून पैसे कसे कमवायचे आणि इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे काय आहेत हे माहित नाही अश्या सर्वांसाठी हा लेख खूप महत्वाचा आहे.

Intraday Treding Mhanje kay?

"शेअर मार्केटमधील शेअर्स किंवा स्टॉक्सची खरेदी आणि विक्री करण्याच्या प्रक्रियेला ट्रेडिंग म्हणतात."

जेव्हा तुम्ही शेअर बाजारात एका दिवसात शेअर्स खरेदी आणि विक्री करता तेव्हा त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. शेअर बाजार उघडणे आणि बंद होणे या दरम्यान तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता.

Intraday treding Time: भारतीय शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत खुला असतो आणि सर्व सुट्टीच्या दिवशी बंद असतो. म्हणून, तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग सकाळी 9:15 ते दुपारी 3:15 पर्यंत करू शकता.

जेही वाचा.. आयपीओ IPO म्हणजे काय ?

इंट्राडे ट्रेडिंग नियम

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये, स्टॉक मार्केट बंद होईपर्यंत तुम्हाला तुमचे सर्व शेअर्स विकावे लागतात.

इंट्राडे ट्रेडिंगची वेळ सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत असते.

स्टॉक मार्केट बंद होईपर्यंत तुम्हाला तुमचे सर्व शेअर्स विकावे लागतील, अन्यथा ब्रोकर तुमचे शेअर्स विकून ट्रेड पूर्ण करेल.

इंट्राडे ट्रेडिंग उदाहरणे

उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमच्या डीमॅट खाते किंवा ट्रेडिंग खात्यातून रिलायन्सचे 10 शेअर्स 3000 रुपयांना विकत घेतले आहेत. त्यामुळे बाजार बंद होईपर्यंत म्हणजे 3:30 पर्यंत तुम्हाला तुमचे सर्व शेअर्स त्यांच्या किंमतीकडे दुर्लक्ष करून विकावे लागतील.

त्यामूळे कधी शेअरचा भाव वाढला तर नफा मिळेल तर कधी शेअरचा भाव पडला तर तोटाही होईल.

परंतु तुम्हाला त्याच दिवशी ट्रेड ऑफ , स्क्वेअर ऑफ करावा लागेल, जर तुम्ही 3:30 पर्यंत तुम्ही विकत घेतलेले शेअर्स विकले नाहीत, तर ते शेअर्स ब्रोकर स्वतः विकतात आणि ट्रेड पूर्ण करतात.

मित्रानो या उदाहरणावरून तुम्हाला intraday treding mhanje kay हे समजले असेलच. आता इंट्राडे ट्रेडिंगशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टीची माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग समजणे अधिक सोपे होईल.


 इंट्राडे ट्रेडिंग कशामध्ये केले जाते ?

इंट्राडे ट्रेडिंग विषयी माहिती घेत असताना मित्रानो सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग कशा काशामध्ये होते. मित्रानो तुम्ही मुख्यतः तीन गोष्टींमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करू शकता.

1 – इक्विटी ( Equity) 

तुम्ही कोणत्याही सूचीबद्ध कंपनीचे शेअर्स सहज खरेदी आणि विक्री करू शकता. त्यामूळे तुम्ही कंपनीचे काही टक्के मालक बनू शकता.

उदा. समजा एखाद्या कंपनीचे 1000 शेअर्स आहेत आणि तुम्ही त्या कंपनीचे 200 शेअर्स विकत घेतले तर तुम्ही त्या कंपनीचे 20 टक्के शेअरहोल्डर बनता.

हेही वाचा.. कमोडिटी मार्केट म्हणजे काय ?

2 - कमोडिटी ( Commodity )

कमोडिटी म्हणजे त्या मौल्यवान वस्तू ज्या मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतात. जसे की -

सोने

धातू

तेल

कृषी उत्पादने

डिजिटल सोने


3 - चलन ( Currency )

तुम्ही अनेक देशांच्या चलनांमध्येही Treding करू शकता.


इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे ( Intraday Treding kase karave )

1 - प्रथम ट्रेडिंग शिका

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जोखीम जास्त असते. जर तुम्हाला ट्रेडिंगबद्दल जास्त माहिती नसेल, तर तुमचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग सुरू करण्याचा विचार कराल तेव्हा तुम्ही आधी ट्रेडिंग, ट्रेड कसे करावे, चांगले शेअर्स कसे खरेदी करायचे, शेअर्स कसे खरेदी करायचे, शेअर्स कधी विकायचे इत्यादी गोष्टी जाणून घ्या.


2 - डीमॅट खाते उघडा

डीमॅट खाते ट्रेडिंगसाठी खूप महत्वाचे आहे. डीमॅट खात्याशिवाय तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. डिमॅट खाते उघडणे ही खुप सोपी गोष्ट आहे.

तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून सुद्धा डीमॅट खाते उघडू शकता. यासाठी प्रथम तुम्हाला Upstox App, Groww App, Zerodha, 5Paisa App, Angle broking App इत्यादी Trading App डाउनलोड करावे लागतील आणि त्यामध्ये तुम्ही सहजपणे डीमॅट खाते उघडू शकाल.


3 - पेपर ट्रेडिंग ( Pepar treding ) 

जर तुम्हाला फक्त ट्रेडिंगबद्दल माहिती असेल परंतु तुम्ही कधीही ट्रेडिंग केले नसेल तर तुमचे नुकसान होण्याची 99 % शक्यता आहे. म्हणूनच वास्तविक ट्रेडिंग करण्याआधी ट्रेडिंगचा सराव करणे देखील महत्त्वाचे आहे.


4 - रिअल ट्रेडिंग सुरू करा

ज्यावेळी तुम्ही सर्व माहिती घेऊन तसेच ट्रेडिंगचे शिक्षण घेतल्यावर शेवटी रिअल ट्रेडिंग सुरू करण्याची वेळ येते. त्यावेळी तुम्ही सरावात जे शिकलात त्याचा फायदा घेऊन इंट्राडे ट्रेडिंग सुरू करा. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.

अशा प्रकारे तुम्ही सहजपणे इंट्राडे ट्रेडिंग सुरू करू शकता आणि इंट्राडे ट्रेडिंगमधून पैसे कमवू शकता.


इंट्राडे ट्रेडिंगमधून पैसे कसे कमवायचे

इंट्राडे ट्रेडिंग करून तुम्ही एका दिवसात चांगले पैसे कमवू शकता आणि गमावू शकता. इंट्राडे ट्रेडिंग नेहमीच धोकादायक असते कारण यामध्ये तुम्हाला शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी फक्त काहीच तास मिळतात. निर्णय घेण्यास थोडासा उशीर झाला, तर नुकसान सहन करावे लागू शकते.

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बहुतेक लोक लोभामुळे पैसे कमवू शकत नाहीत. कारण ते लोक मेंदूचा फारसा उपयोग न करता ते शेअर्स खरेदी करतात ज्यांच्या किमती वाढत असतात, पण नंतर त्या शेअर्सच्या किमती अचानक कमी होतात. ज्यामुळे लोकांना तोटा सहन करावा लागतो.

हेही वाचा.. एसआयपी SIP म्हणजे काय ?

इंट्राडे ट्रेडिंगसाठी काही महत्त्वाच्या टिप्स

- शेअर बाजाराबाबत अपडेट राहावे लागते, तरच तुम्हाला कोणत्या स्टॉकचा फायदा होऊ शकतो याची अचूक कल्पना येऊ शकते.

- अफवांवर लक्ष देऊ नका, शेअर्स खरेदी करण्यापूर्वी कंपनीबद्दल Research करा.

-लोभी होऊ नका. शेअर्स खरेदी करताना तुमच्या बुद्धीचा वापर करा.

- जोखीम कमी प्रमाणात घ्या

- नुकसानीची देखील तयारी ठेवा.

-पूर्ण ज्ञान आणि चांगल्या सरावानंतरही इंट्राडे ट्रेडिंग करा.

- फक्त high liquidity असलेले स्टॉक निवडा. तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये high liquidity चे 2 किंवा 3 शेअर्स निवडू शकता.

- तुम्ही विकत घेतलेल्या शेअर्सच्या किमती कोणत्या ट्रेंडमध्ये आहेत याबद्दल नेहमी अपडेट रहा


इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे

इंट्राडे ट्रेडिंगचे अनेक फायदे आहेत जे खालीलप्रमाणे आहेत -

1 - जास्त मार्जिन 

इंट्राडे ट्रेडिंग करण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्जिन मिळते. मित्रानो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्हाला ब्रोकरकडून 3 ते 20 पट अधिक मार्जिन मिळते. ज्यामुळे तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कमी पैशात जास्त शेअर्स खरेदी करू शकता.

2 - कुठेही ट्रेडिंग करू शकता

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्ही सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत कुठेही ट्रेडिंग करू शकता. ट्रेडिंगसाठी तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन आणि लॅपटॉप किंवा मोबाईल असणे आवश्यक आहे.

3 - एका दिवसात पैसे कमवू शकता

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्ही तुमचे शेअर्स एका दिवसात विकून पैसे कमवू शकता. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागत नाही.

4 - मार्केट खाली असतानाही तुम्ही पैसे कमवू शकता

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये शेअर्सची किंमत वाढल्यावर तुम्ही पैसे कमवू शकता. पण शेअरची किंमत कमी झाल्यावर शॉर्ट सेलिंगद्वारेही पैसे कमवू शकता.

5 - पॅसिव्ह इनकम करू शकतो

शेअर मार्केटमध्ये खूप पैसा आहे, जे लोक ट्रेडिंगमध्ये निष्णात आहेत, ते इंट्राडे ट्रेडिंगद्वारे एका दिवसात लाखोंची कमाई करतात. ट्रेडिंग मधून पैसे कमविणे ही एक निष्क्रिय उत्पन्न कल्पना आहे जिथे तुम्हाला येथे सतत काम करण्याची गरज नाही.

हेही वाचा..  म्युच्युअल फंड म्हणजे काय ? 
इंट्राडे ट्रेडिंग तोटे ( Loss )

एकीकडे इंट्राडे ट्रेडिंगचे अनेक फायदे आहेत, तर दुसरीकडे काही तोटे देखील आहेत–

जर तुम्हाला ट्रेडिंगचे चांगले ज्ञान नसेल तर तुम्ही तुमचे सर्व पैसे गमावू शकता.

शेअर मार्केटमध्ये तुमची अचूकता योग्य नसल्यास इंट्राडे ट्रेडिंग खूप धोकादायक आहे.

इंट्राडे ट्रेडिंगचे एक कटू सत्यआहे की, दिवसअखेरीस फक्त 10 टक्के लोकच येथून पैसे कमवून जातात.


तर मित्रानो कसा वाटला आजचा Intraday Treding विषयी असलेला हा लेख. मित्रानो हा लेख आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.l

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या