➡️ जिरेनियम शेती म्हणजे नेमके काय?
जिरेनियम ही एक सुगंधी वनस्पती असून त्यापासून सुगंधित तेल निर्मिती होते. या पिकाला कोणताही जंगली प्राणी खात नाही. शिवाय त्यावर कुठल्याही रोग पडत नसल्याने रसायनांची फवारणी करण्याची गरज नाही. एका एकरामध्ये १० हजार ते ११ हजार रोपांची लागवड करता येते. या रोपांची लागवड ३ किंवा ४ फूट दोन सरींमधील अंतर ठेवून दोन रोपांमधील अंतर १ ते दीड फूट ठेवून करता येते. पाणी गरजेनुसार देता यावे, यासाठी ठिबक सिंचन बसवून लागवड करावी. एकदा लागवड केल्यानंतर जिरेनियम पिकातून ३ ते ५ वर्षे उत्पन्न घेता येते. एका एकरामध्ये एका वर्षात सर्वसाधारपणे ४० टन बायोमास उत्पादनातून ३० ते ४० किलो तेलाचे उत्पादन होते. वर्षातून ३ ते ४ वेळा कापणीच्या हिशोबाने एका एकरात जवळजवळ साडेतीन ते चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
➡️ लागवड कशी करावी
1) बारमाही वाढणारी सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे .
2) लागवड बारमाही केली जाते .
सामान्य तापमानात वाढणारी ही वनस्पती असून (15 अंश सेल्सियस ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत )
पाण्याची गरज सामान्य असते जास्त पाणी किंवा कमी पाण्याचा ताण या जिरेनियम वनस्पतीला सहन होत नाही.
3) सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये जिरेनियम पिकाची लागवड करता येते.
4) एकरी साधारणतः दहा हजार ते अकरा हजार रोपाची लागवड करावी
5) एका रोपाची किंमत ४ ₹ असते
6) मल्चिंग पद्धतीने सुद्धा या पिकाची लागवड होते. याप्रकारे लागवड केल्यास उत्पादन वाढते
7) इतर पिकांप्रमाणेच या पिकालाही खते व पाण्याचा पुरवठा करावा लागतो
➡️काढणी कधी केली जाते
पाने परिपक्व झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी जिरेनियम पिकाच्या पानांची पहिली काढणी केली जाते. काढणीच्या वेळी पाने पिवळी किंवा जास्त रस असलेली नसली पाहिजेत. मशरूम शेती कशी करावी?
➡️जिरेनियम पिकाच्या सुधारित पजाती कोणत्या
जिरेनियमच्या प्रमुख जाती अल्जेरियन, Bourbon, इजिप्शियन आणि सिम-पवन या आहेत.
➡️जिरेनियम शेतीचे फायदे कोणते आहेत ?
जिरेनियम च्या रोपावर कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे या पिकावर कीटकनाशके व औषध फवारणीचा नगण्य आहे .त्या पिकाला कोणताही प्राणी खात नसल्यामुळे त्यासाठी कोणतेही विशिष्ठ संरक्षण करावे लागत नाही. या पिकातून पारंपरिक पिकांपेक्षा अधिक आणि समाधानकारक नफा मिळतो. जिरेनियम पिकामध्ये आंतरपीक घेता येते. हे नगदी पीक त्यामुळे आथिर्क उत्पन्न चांगले आहे. जीरेनियम तेलाला बाजारांमध्ये खूप मागणी आहे त्यामुळे दरही चांगला असतो. जिरेनियम पासून तेल निर्मिती, रोपांची निर्मिती व शिल्लक राहिलेल्या पाल्यापासून कंपोष्ट खत तयार करू शकतो. दुष्काळी भागात जिथे पाण्याची कमतरता आहे तेथील शेतकरी जिरेनियम शेती करण्याचा विचार करावा.
➡️ जिरेनियम तेलाचा उपयोग कशासाठी केला जातो?
जिरेनियम तेलापासून अनेक सुगंधी प्रॉडक्ट बनवले जातात, जसे कि औषधे, कॉस्मेटिक्स साबण आणि डिटर्जंट शाम्पू , सेंट , अगरबत्ती पावडर, . अशा प्रकारच्या अनेक वस्तूमध्ये जिरेनियम चा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या वस्तुंना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून चांगलें कंपोस्ट खत निर्मिती करता येते.
➡️ जिरेनियम पिकाची कोणती काळजी घ्यावी
जिरेनियमच्या फांद्याची तोडणी करून त्यापासून तेल बनवले जाते. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तेथे फक्त या पिकाची पावसाळ्यात जास्त काळजी घावी लागते. कारण जास्त पावसामुळे पिकाच्या खालच्या भागातील फांद्या खराब होऊ शकतात. उर्वरित ऋतूमध्ये या पिकावर काहीही परिणाम पडत नाही. मोबाईल वरुन मिळवा ५ लाख रुपये कर्ज

0 टिप्पण्या