Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता एका मिस कॉल वर!

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता एका मिस कॉल वर! जाणून घ्या आधिक माहिती
CM Relief Fund: मुख्यमंत्री सहायता योजनेचा लाभ घेण्यासाठी पुर्वी ऑनलाईन फॉर्म भरून तो मंत्रालयात सादर करावा लागत असत त्यानंतर तो निधी मिळत असत. यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक समस्या येत असत. या गोष्टीचा विचार करून राज्य सरकार मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबर वर केवळ एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. या प्रक्रियेमुळे कमी वेळात व सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधी लाभार्थ्यांना मिळणार आहे. 

मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी लोकांना अर्ज भरताना खूप चुका होत असत त्यामुळे पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागत असे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना याचा त्रास होत असे व वारंवार पाठापुरावा करावा लागत होता. पण आता थेट एका मिस कॉल वर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध झालेली आहे.

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून सर्वात जास्त कर्करोगावरील उपचारांसाठी अर्ज येतात हे अर्ज एकूण अर्जाच्या 25% इतके असतात त्यानंतर हृदयविकार गुडघा प्रत्यारोपण खुबा प्रत्यारोपण अपघात तसेच किडनीशी संबंधित डायलेसिस व उपचार या मदतीसाठी अर्ज सादर होत असतात या व्यतिरिक्त शॉक लागणे व भाजणे यावरील उपचारासाठी देखील अर्ज येत असतात.

 

प्रक्रिया कशी करावी

 अर्जदाराने 8650567567 या मोबाईल नंबर वर एक मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर संबंधित अर्जाची लिंक एस एम एस द्वारे आपणास प्राप्त होईल या लिंक वर क्लिक केल्यानंतर एक अर्ज डाऊनलोड होईल या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा लागणार आहे तसेच या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे pdf स्वरूपात स्कॅन करून ती cmrf.maharashtra.gov.in या मेल आयडी वर पाठवायचे आहेत.


आवश्यक कागदपत्रे

1) विहित नमुन्यातील अर्ज.

2) उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचे प्रमाणीकरण ( खाजगी रुग्णालयासाठी सिव्हील सर्जन यांचे प्रमाणपत्र).

3) तहसीलदार उत्पादन दाखला ( 1.60 लाखाच्या आतील).

4) रुग्णाचे आधारकार्ड ( लहान बालकांसाठी आईचे आधारकार्ड).

5) रुग्णाचे रेशन कार्ड.

6) आजाराचे सर्व रिपोर्ट्स.

7) प्रत्यारोपण रुग्णांसाठी शासकीय समिती मान्यता.

8) अपघात असल्यास FIR कॉपी.


पूर्वी मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी येणारे अर्ज हे अपूर्ण स्वरूपात असत त्यामुळे मदत करण्यास खूप अडचणी येत होत्या सध्या मिस कॉल वर सदर सुविधा उपलब्ध आहे तरी या प्रक्रियेसाठी एका ॲपची निर्मिती केली जाणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया अधिकच गतिमान होऊन एकाच वेळी सर्व अर्ज स्वीकारले जातील त्यामुळे नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क देखील साधावा लागणार नाही.


अधिक माहितसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष -- 8650567567
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या