Opportunities in Agriculture :सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक युवक करिअर च्या बाबतीत गोधळलेल्या मनस्थितीत असतात. त्यामध्ये बारावीनंतर विद्यार्थी खूपच द्विधा मनस्थितीत जातात त्यांना कोणत्या क्षेत्रात आपण आपले करिअर करावे, त्यामध्यें किती प्रणानात संधी उपलब्ध असतील अश्या अनेक प्रश्नांनी त्यांना घेरलेले असते अशात काही विद्यार्थी इंजिनीअरिंग, काही मेडिकल आणि काही इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण सद्ध्या भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्या कृषी क्षेत्राकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल खूपच कमी आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात या या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी संधी आहे. कारण कोरोणा काळाचा विचार केल्यास कृषी क्षेत्र वगळता पुर्ण जग ठप्प झाले होते. त्यामूळे कोरोना काळात परत एकदा सिद्ध झाले की कृषी क्षेत्र हा जगाचा पाया आहे. त्यामूळे सर्व काही ठप्प झाले तरी हे क्षेत्र शेवट पर्यंत चालू राहील.
त्यामूळे आज या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत अनेक करिअर च्या वाटा दिसत आहेत. आज त्याच कृषी क्षेत्रातील करिअर आणि संधी याविषयीचा लेख घेऊन आलो आहोत. कृषि क्षेत्रातील करिअर आणि त्यातील संधी याची माहिती जाणुन घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा..
कृषी क्षेत्रातील करिअर आणि त्यातील संधी ! ( Careers and Opportunities in Agriculture )
➡️पात्रता :
बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक.
हेही वाचा... 12 वी नंतर पुढे काय करावे ?
➡️ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम
1) बी.एस्सी (कृषी)
2) बी.एस्सी (उद्यानविद्या)
3) बी.एस्सी (वनशास्त्र)
4) बी.एफ.एस्सी
5) बी.एस्सी (कृषी जैवतंत्रज्ञान)
6) बी.एस्सी (पशुसंवर्धन)
7) बी.टेक (अन्नशास्त्र)
8) बी.बी.ए. (कृषी)
9) बी.टेक (कृषी अभियांत्रिकी)
10) बी.एस्सी (गृहविज्ञान)
➡️ प्रवेश प्रक्रिया :
कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीला मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी धरण्यात येते. शेती विषय बारावीला घेतला असल्यास त्याचे १० गुण वाढीव मिळतात. ७/१२चा उतारा असणाऱ्या शेतीधारकांच्या तसेच भूमिहीन शेतमजुरांच्या (तहसीलदार/नायब तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक) पाल्यासाठी १२ टक्के वाढीव गुण प्रवेशासाठी धरले जातात.
हेही वाचा... 10 वी नंतर हे कोर्स करून हमखास नोकरी मिळवा
➡️ करिअर संधी : ( careers in Agriculture )
महसूल विभाग, वन विभाग, पोलीस खाते, वित्त विभाग इत्यादी विभागांमध्ये वर्ग-१, वर्ग-२ पर्यंतच्या सर्व पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी/ विकास अधिकारी, अन्न महामंडळ, पणन महामंडळ व खादी ग्रामोद्योग या ठिकाणीही कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी ( Job opportunities in Agriculture) उपलब्ध आहेत.
➡️ कृषि विद्यापीठे
▪ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर, 413722
▪ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, 444104
▪ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, 431402
▪ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, 415712
तर मित्रानो कसा वाटला आजचा कृषी क्षेत्रातील करिअर आणि संधी याविषयीचा आजचा लेख. हा लेख आपल्याला आवडला असेल तर नक्की आपल्या मित्र मंडळीना शेअर करा.

0 टिप्पण्या