CIBIL स्कोर म्हणजे काय? आणि तो कशासाठी वापरला जातो ? तो कसा बनवला जातो? याविषयी सर्व सविस्तर आम्ही या लेखामध्ये दिली आहे. Cibil mhanje kay kay
सिबिल अहवाल ( CIBIL Report ): क्रेडिट संकेतस्थळं नुसार 750 वरील कोणताही सिबील स्कोअर चांगला असतो. CIBIL अहवालात दिलेल्या क्रेडिट हिस्ट्री चा वापर करून CIBIL स्कोर तयार केला जातो.CIBIL रिपोर्ट : आपल्याला कर्ज मिळेल की नाही हे आजघडीला आपल्या CIBIL स्कोअर वर अवलंबून आहे. त्यामूळे हा CIBIL स्कोर नेमका काय आहे हे प्रत्येकास माहित असणे गरजेचे आहे? सीबिल CIBIL समजून घेण्यासाठी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जर तुमच्याकडे कोणीतरी पैसे मागितले आहेत आणि तुम्हाला मोठी रक्कम कर्ज स्वरूपात द्यावी लागणार आहे. पण हे पैसे देत असताना तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करून घ्यावी लागणार म्हणजेच समोरची व्यक्ती पैसे परत करण्यास सक्षम आहे का? व त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे? यापूर्वी कोणाकडून कर्ज घेतले आहे का? आणि जर त्याने दुसरीकडून कर्ज घेतले असेल तर ते कर्ज वेळेत परत केले आहे का? किंवा त्याचा इन्कम सोर्स काय काय आहे? दुसऱ्या ठिकाणाहून घेतलेले कर्ज हप्त्यांमध्ये परत केले असल्यास, हप्ता योग्य वेळी दिला गेला की नाही. या सर्व बाबींचा समावेश सिबिल अहवालात नमूद केलेला असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी सिबलशी संबंधित आहे. त्यामूळे बँकेकडून कर्ज घेताना CIBIL स्कोर प्रत्येक वेळी नमूद केला जात आहे.
सिबील अहवाल देणारी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) आता TransUnion CIBIL लिमिटेड म्हणून ओळखले जाते. ही एक क्रेडिट ब्युरो आहे आणि तिला क्रेडिट रेटिंग एजन्सी सुध्दा म्हणतात. हही संस्था व्यक्तींच्या तसेच कंपन्यांच्या क्रेडिट संबंधित व्यवहारांच्या नोंदी ठेवते. यामध्ये क्रेडिट कार्ड व्यवहार आणि त्याची मंजुरी आणि कर्ज आणि कर्ज परतफेडीचे पुनरावलोकन समाविष्ट आहे.
हेही वाचा.. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
CIBIL ची स्वतःची वेबसाइट सुध्दा आहे आणि त्यानुसार ब्युरो क्रेडिट हिस्ट्री आणि आर्थिक स्थिती स्पष्टपणे समजून घेण्यासाठी माहिती आणि साधने प्रदान करते. जोपर्यंत व्यवसायाचा संबंध ब्यूरो सोबत आहे तोपर्यंत ब्यूरो खरी माहिती आणि उपाय पसुचवतो. आणि त्यामुळे चांगले निर्णय घेण्यास मदत होते. ट्रान्सयुनियनने CIBIL मध्ये 92.1 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. आणि TransUnion ही अमेरिकन कंपनी आहे.
CIBIL स्कोअर ग्राहकाच्या क्रेडिट हिस्ट्री बद्दल सर्व माहिती देत असतो. आणि स्कोअर तीन अंकी असतो. त्यामुळेच यांच्यावरून l एखाद्या व्यक्तीच्या कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याच्या क्षमतेचे मोजमाप केले जाते. यलाच त्या ग्राहकाची क्रेडिट प्रोफाइल म्हंटले जाते .
CIBIL स्कोअरची श्रेणी ही 300 ते 900 दरम्यान असते. एका व्यक्तीला 300 ते 900 मध्ये गुण दिले जातात. CIBIL स्कोअर 900 च्या जितका जवळ असेल तितका चांगला. आणि सिबील जितके चांगले असेल तितके कर्ज मंजूर करणे सोपे आणि जलद होते.
क्रेडिट वेबसाइट्स नुसार 750 वरील कोणताही सिबील स्कोअर चांगला असतो. CIBIL अहवालात दिलेल्या क्रेडिट इतिहासाचा वापर करून CIBIL स्कोर तयार केला जातो.
हेही वाचा.. पी एम मुद्रा योजना म्हणजे काय?
CIBIL अहवालात एखाद्याने घेतलेल्या सर्व कर्जांची संपूर्ण माहिती असते. यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, ओव्हरड्राफ्ट सुविधा इत्यादींचा समावेश आहे.
CIBIL स्कोअर व्यतिरिक्त, अन्य काही गोष्टी सुध्दा CIBIL अहवालात समाविष्ट केल्या जातात जसे की, कर्जदाराची वैयक्तिक माहिती म्हणजेच नाव, जन्मतारीख, लिंग आणि पॅन, पासपोर्ट क्रमांक, मतदार क्रमांक, आधार क्रमांक यासारख्या माहितीचा समावेश केला जात आहे. त्या्याबरोबर कर्जदाराचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक, रोजगाराची माहिती व बँका आणि वित्तीय संस्थांनी दिलेल्या मासिक आणि वार्षिक उत्पन्नाचा तपशील म्हणजेच पगार स्लीप आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या सर्व खात्याची माहिती जसे की एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या सर्व कर्जाचा हिशेब आहे. यामध्ये कर्ज देणाऱ्या बँक/वित्तीय संस्थेचे नाव, कर्जाचा प्रकार (घर, वाहन, वैयक्तिक, ओव्हरड्राफ्ट इ.), खाते क्रमांक, मालकीचे तपशील, शेवटच्या पेमेंटची तारीख, कर्जाची रक्कम, सध्याची शिल्लक आणि तुमच्या पेमेंटचे मासिक रेकॉर्ड समाविष्ट असतात. .
यामधील शेवटचा भाग म्हणजे चौकशी जेव्हा कोणी कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करते तेव्हा संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेला CIR अहवाल प्राप्त होतो. सिस्टीम त्याची क्रेडिट हिस्ट्री पाहून एक नोट तयार करते. याला 'चौकशी' म्हणतात. या सर्व अहवालाच्या आधारे क्रेडिट रिपोर्ट जारी केले जाते व याच क्रेडिट रिपोर्ट ला सिबील म्हंटले जाते.
0 टिप्पण्या