Hot Posts

6/recent/ticker-posts

इंस्टाग्राम वरुन पैसे कसे कमवायचे?

 मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत इंस्टाग्राम वरुन पैसे कमवण्याचे नवीन मार्ग? 

इंस्टाग्राम वरुन पैसे कसे कमवायचे?आजच्या डिजिटल काळात बहुतांश लोक सोशल मीडियावरून लाखो रुपये कमावत आहेत. आणि तुम्हीही ऐकले असेल किंवा तुम्हीही सोशल मीडियावरून पैसे कमवत असाल. मित्रानो आजच्या काळात, असे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्हाला पैसे कमवण्याची अनेक संधी देतात, जसे की Facebook, YouTube, WhatsApp, Amazon, ज्याचा वापर करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामवरून पैसे कसे कमवायचे ते सांगणार आहोत. मित्रानो तुम्हाला माहीतच आहे की इंस्टाग्राम एक अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया ॲप आहे. ज्याचा वापर करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. ( Earn money online Instagram in marthi )

इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ लोकांसोबत शेअर करू शकता. यामध्ये तुम्ही रील देखील बनवू शकता. इंस्टाग्राम हे फेसबुक आणि व्हॉट्सॲप सारखेच कार्य करते. इंस्टाग्राम लॅपटॉप किंवा तुमच्या मोबाईलवर चालवता येते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही फेसबुकचे फॉलोअर्सही वाढवू शकता. इंस्टाग्रामवर दररोज 75 दशलक्षाहून अधिक लोक सक्रिय असतात. आतापर्यंत 500 दशलक्षाहून अधिक लोकांनी इन्स्टाग्राम डाउनलोड केले आहे.

इंस्टाग्राम वरुन पैसे कमावण्याचे मार्ग (Instagram Varun paise kamvayche marg in Marathi)

मित्रानो इंस्टाग्रामची स्थापना ६ ऑक्टोबर २०१० रोजी झाली. इंस्टाग्रामचे संस्थापक केविन सिस्ट्रॉम हे आहेत. इन्स्टाग्राम लोकप्रिय झाल्यानंतर, फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्गने नोव्हेंबर 2010 मध्ये $ 1 बिलियनमध्ये विकत घेतले. मित्रानो इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्यासाठी आधी तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट बनवावे लागेल. तुम्हाला रोज पोस्ट प्रकाशित करावी लागेल. तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे फॉलोअर्स वाढवावे लागतील. मित्रानो आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही घरबसल्या इन्स्टाग्रामवर पैसे कमवू शकाल. 

हेही वाचा.. ऑनलाईन पैसे कमावण्याचे 7 खात्रीशीर मार्ग

1. एफिलिएट प्रोग्राम (Affiliate marketing)

मित्रांनो तुम्ही Affiliate Marketing द्वारे इंस्टाग्राम वरुन पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला एखाद्या कंपनीचे उत्पादन विकावे लागेल, त्यानंतर कंपनी तुम्हाला त्याचे काही कमिशन देईल. Affiliate Marketing करण्यासाठी तुम्हाला एखादया कंपनीच्या Affiliate Programs मध्ये सामील व्हावे लागेल. यानंतर, कंपनीकडून तुम्हाला एक लिंक दिली जाईल. जी लिंक तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करावी लागेल. त्यानंतर जर कोणी त्या लिंकवरून ती खरेदी केली तर तुम्हाला त्याचे कमिशन स्वरूपात पैसे मिळतील. मित्रानो Amazon आणि Flipkart, Meesho वेबसाइट Affiliate Programs चालवतात. तुम्हाला त्यांच्या एफिलिएट प्रोग्राममध्ये सामील व्हावे लागेल आणि तुमच्या इन्स्टाग्राम पेजवर त्यांच्या उत्पादनाची लिंक पोस्ट करावी लागेल आणि तुमच्या पोस्टच्या बायोमध्ये लिंक समाविष्ट करावी. त्यानंतर जो कोणी तुमच्या लिंकवरून उत्पादन विकत घेईल, त्यावेळी तुम्हाला त्याचे कमिशन मिळत जाईल.


2. दुसऱ्यांच्या Instagram अकाउंट चा प्रचार करून ( Instagram Account Promotion )

प्रत्येकाला इंस्टाग्रामवर प्रसिद्ध व्हायचे असते. मित्रानो जर तुम्ही इतर इंस्टाग्राम खात्यांचा प्रचार करणार असाल तर तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता. जेव्हा तुमच्या खात्यावर भरपूर फॉलोअर्स असतील, तेव्हा अनेक खाती तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमच्या खात्याचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला चांगली रक्कम देतील. तुम्ही इतर खात्यांचे प्रमोशन करणार असाल तर लोकांना कळवण्यासाठी तुम्ही तुमच्या पेजच्या हायलाइट्स विभागात पोस्ट हायलाईट करू शकता. एका जाहिरातीसाठी तुम्ही 10 ते $20 पर्यंत म्हणजे 800 ते 1600 रुपये शुल्क आकारू शकता.


3. उत्पादनाची विक्री करून ( product selling)

तुमचा एखादा व्यवसाय असेल तुम्ही तुमची स्वतःची उत्पादने विकत असाल, तर इन्स्टाग्रामच्या मदतीने तुम्ही त्यांची जाहिरात करू शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या उत्पादनाचा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करावा लागेल आणि त्या उत्पादनाची संपूर्ण माहिती खाली असणाऱ्या कॅप्शनमध्ये लिहावी लागेल, जेणेकरून ती वस्तू खरेदी करू इच्छिणारी व्यक्ती तुमच्याशी थेट संपर्क साधेल.

हेही वाचा.. मीशो वर काम करुन कमवा महिना 50 हजार पेक्षा जास्त

4. Instagram चे अकाऊंट विकून ( Instagram Account selling)

तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये तुमचे फॉलोअर्स जास्त असतील तर तुम्ही तुमचे अकाउंट विकून देखील भरपूर पैसे कमवू शकता. मित्रानो तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये जास्त फॉलोअर आणि लोकांची एंगेजमेंट असली पाहिजे. जर ते दोन्ही नसेल तर तुमचे अकाउंट कोणीही विकत घेणार नाही. जास्त फॉलोअर्स आणि एंगेजमेंट असल्यामुळे लोक त्यांच्या ब्रँड आणि उत्पादनाचे मार्केटिंग करू शकतील. अशा प्रकारे तुम्ही तुमचे Instagram अकाउंट विकूनही पैसे कमवू शकाल


5. दुसऱ्यांच्या ब्रँडचा प्रचार करून ( Brand promotion) 

मित्रानो तुमचे इंस्टाग्राम खाते चांगल्या प्रकारे ग्रो झाले असेल तर मोठ्या कंपन्या किंवा ब्रँड तुमच्या इन्स्टाग्राम खात्यावर त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी आणि त्यांच्या प्रॉडक्ट च्या पोस्टसाठी भरपूर पैसे देऊ शकतात.


6. फोटो विकून ( Photo selling )

मित्रानो तुम्ही जर चांगले छायाचित्रकार असाल तर तुम्ही इंस्टाग्राम वरून चांगले पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कॅप्चर केलेल्या फोटोंवर वॉटरमार्क टाकून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करावे लागतील आणि तुमचा संपर्क क्रमांक टाकावा लागेल.जर कोणाला तुमचा फोटो आवडला असेल तर ते तुमच्याशी संपर्क साधतील. त्यानंतर तुम्ही ते फोटो विकून पैसे कमवू शकाल.

हेही वाचा.. डिजिटल शिक्षणाचे फायदे व तोटे

7. दुसऱ्यांच्या Instagram अकाउंट चे व्यवस्थापन करून ( Instagram Account Manegement)

मित्रांनो तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट चांगले चालवत असाल तर तुम्ही इतर ब्रँडचे इंस्टाग्राम अकाऊंट व्यवस्थापित करून पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला मोठ्या ब्रँडशी संपर्क साधावा लागेल, अशा प्रकारे तुम्ही एखाद्याचे इन्स्टाग्राम अकाउंट मॅनेज करूनही पैसे कमवू शकता.

तर मित्रानो कसा वाटला आजचा इंस्टाग्राम वरुन पैसे कसे कमवावे हा लेख तर मित्रानो आजचा लेख आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या