Career After 12th: १२ वी च्या निकालानंतर जे मेरिट लिस्टमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे त्यांना आणि जे उत्तीर्ण झाले आहेत त्यांना अशा सर्वाँना सतावणारा प्रश्न म्हणजे बारावीनंतर पुढे कोणता करिअर ऑप्शन निवडावा? आणि यासाठीच आम्ही हा लेख घेउन आलो आहोत ज्यात्वतुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता.
बारावीनंतर विज्ञान शाखेतील (12th Science)करिअरच्या संधी
जर तुम्ही विज्ञान शाखेचे ( 12th science) विद्यार्थी असाल, तर तुम्ही पुढे B.Sc पदवीधर होऊ शकता. यामध्ये तुम्हाला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र यांसारखे विषय किंवा यापैकी एक विषय निवडून त्यात पदवीधर होऊ शकता. तसेच पुढील अभ्यासक्रमासाठी तुम्ही एखाद्या नामांकित युनिव्हर्सिटीतून M.Sc देखील करू शकता.
बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये आपले भविष्य घडवू शकतात तसेच आयआयटी आणि जेईई परीक्षेची तयारी करू शकतात. जर तुम्हाला डॉक्टर बनायचे असेल तर तुम्ही NEET चा अभ्यास करून मेडिकल साठी प्रवेश घेऊ शकता.जर तुम्हाला अभियांत्रिकीचे आणि मेडिकल चे शिक्षण घ्यायचे नसेल तर ते B.Sc, BA, ग्रॅज्युएशन आणि हॉटेल मॅनेजमेंट कोर्स असे अनेक पर्याय विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसमोर असतात
बारावीनंतर कला शाखेतील (12th Arts) करिअरच्या संधी
खरंतर कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक करिअर ऑप्शन्स आहेत.
१. B.C.A (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन्स )
२. B.J.M. (बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन )
३. B.B.A (बॅचलर ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन )
४. B.A (बॅचलर ऑफ आर्ट्स )
५. B.El.Ed (बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन )
६. इंटिग्रेटेड लॉ कोर्स : लॉ अर्थात कायद्याच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याचा एकूण कालावधी हा पाच वर्षांचा असतो. यात विविध कायदा प्रकारच्या कायद्याच्या क्षेत्रांचा समावेश असतो. उदाहरणार्थ वनविषयक कायदे, आयपीसी [IPC], ग्राहक संरक्षण कायदा, व्यावसायिक कायदा इत्यादी.
७. B. P. ED (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन )
८. B.E.M (बॅचलर ऑफ इवेंट मॅनेजमेंट )
९. Bsc नर्सिंग
10. B.H.M. (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट )
११. B.M.M. (बॅचलर इन मास मीडिया)
१२. फॅशन डिझायनिंग
१३. होम सायन्स
१४. इंटिरियर डिजाइनिंग
१५. ग्राफिक डिझाईन
१६. ट्युरिझम कोर्स
बारावीनंतर वाणिज्य शाखेतील (12th Commerce) विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी
कॉर्पोरेट जगात काम करू इच्छिणारे विद्यार्थी सहसा त्यांच्या शिक्षणातील वाणिज्य क्षेत्राची निवड करतात आणि कॅट (CAT) , एक्सएट (XAT) आणि एमएटी (MAT) या परीक्षा देणे आवश्यक आहे. भारत आणि परदेशातील अनेक महाविद्यालये वाणिज्य क्षेत्रातील कोर्स उपलब्ध करुन देत आहेत. बारावी वाणिज्यानंतर डिप्लोमा अभ्यासक्रम, युजी अभ्यासक्रम (अंडर ग्रॅज्युएशन /Under Graduation) आणि पीजी अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएशन / Post Graduation) करण्याची शक्यता आहे.
बारावीत वाणिज्य विद्यार्थी म्हणून अर्थशास्त्र, लेखाशास्त्र, गणित आणि व्यवसाय अभ्यास या मूलभूत संकल्पनांविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. या संकल्पनांचे चांगले ज्ञान हे आपल्याला वाणिज्य क्षेत्रात आपल्या पुढील शिक्षणास मदत करेल.
वाणिज्य क्षेत्रात12 वी पूर्ण केल्यानंतर आपल्याकडे निवडण्यासारखे बरेच पर्याय आहेत. बीबीए आणि बी.कॉम हे विद्यार्थ्यांनी निवडलेले सर्वात सामान्य कोर्स आहेत. बीबीए आणि बी.कॉम व्यतिरिक्त इतरही कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही एक उत्तम करियर बनवू शकतात. जसे की तुम्ही
१. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (B.M.S)
२. बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज (B.B.S)
३. बॅचलर मास्टर ऑफ कॉमर्स (M.Com)
४. व्यवसाय प्रशासन मधील मास्टर (M.B.A)
५. बीएड (B.ed)
६. आयसीडब्ल्यूए बॅचलर इन लायब्ररी सायन्स
७. इंपोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा
८. बी.सी.ए. (BCA)
९. एल.एल.बी. (LLB)
यांसारखे शैक्षणीक पर्याय तुम्ही निवडू शकता.
.jpeg)
0 टिप्पण्या