Hot Posts

6/recent/ticker-posts

कमी गुंतवणुकीत सूरु करता येणारे व्यवसाय !

 मित्रानो जर तुम्ही कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर कमी खर्चात सूरु होणारे असे काही मुख्य व्यवसाय सांगणार आहोत जे व्यवसाय सुरू करून तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकता. आजच्या काळात प्रत्येकजण कमी गुंतवणुकीमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतात. प्रत्येकाच्या कौशल्यानुसार अनेक प्रकारचे व्यवसाय महिला आणि पुरुष सुरू करू शकतात. ज्यामध्ये शिलाई, भरतकाम, विणकामापासून इतर अनेक प्रकारच्या व्यवसायांचा समावेश असतो.

कमी गुंतवणुकीत सूरु करता येणारे व्यवसाय !

त्याचबरोबर ऑनलाइन व्यवसायाशी संबंधित उद्योगही सुरू करता येतात. ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्या व्यक्तीकडे संगणक प्रणाली आणि इंटरनेट आणि सॉफ्टवेअर इत्यादी सुविधा असणे आवश्यक असते.

Low investment Bussiness idea in Marathi 

त्याचबरोबर खाण्यापिण्याशी संबंधित व्यवसाय जसे की केटरिंग, फूड ट्रक व्यवसाय, टिफिन सेवा इत्यादी व्यवसाय एखादी व्यक्ती त्याच्या कौशल्यानुसार कमी पैशात सुरू करू शकते. याबरोबरच जर तुम्हाला चित्रकला यासारख्या गोष्टीमध्ये रस असेल तर तुम्ही कमी गुंतवणूकीत हा व्यवसाय देखील सुरू करू शकता.

मित्रानो अनेक वेळा असे होते की लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्याची माहिती नसते. त्याचबरोबर कोणता व्यवसाय करावा याविषयी गोंधळलेले असतात. म्हणुनच मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहोत, ज्या माहिती मध्ये तुम्ही कमी खर्चात विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करून महिन्याला चांगली कमाई करू शकता.

कमी गुंतवणुकीत हे 5 व्यवसाय सुरू करा
1. लोणचे व्यवसाय
 

लोणची बनवण्याचा व्यवसाय हा फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो, तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकतात. लोणच्याच्या व्यवसायातून उत्पादनाची मागणी वाढल्यास महिन्याला किमान २५ हजार ते ३० हजार रुपये तुम्ही कमवू शकाल.

हेही वाचा.. मीशो वर काम करुन कमवा महिना 50 हजार पेक्षा जास्त

2. टिफिन सेवा

शहरी भागांतर्गत येणाऱ्या लोकांना टिफिन सेवा सुरू करता येईल. हा व्यवसाय सुध्दा तुम्ही घरूनच सुरू करू शकतात. आजच्या युगात अनेक विद्यार्थी व नागरिकांना रोजगाराच्या शोधात आपल्या शहरातून इतर शहरात जावे लागत आहे.

अशा परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहिल्याने त्यांना जेवण-खाण्या संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामूळे तुम्ही टिफिन व्यवसाय सुरू करून नागरिकांना टिफिन सेवा देऊन दर महिना चांगले उत्पन्न मिळू शकते.

3. शिवणकाम व्यवसाय

महिला आणि पुरुष दोघेही घरात बसून शिवणकाम व्यवसाय सुरू करू शकतात. कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. या व्यवसायातून तुम्ही दर महिना चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी हा एक चांगला व्यवसाय आहे जो विशेषतः महिलांसाठी खूप चांगला पर्याय आहे.

कमी गुंतवणूकीमध्ये हा व्यवसाय सुरू करून महिला घरबसल्या चांगले उत्पन्न मिळवू शकतात. आजच्या युगात मोठ्या शहरांमध्ये शिवणकाम, भरतकाम आणि विणकामाला खूप मागणी आहे. टेलरिंग / एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय हा मूलभूत गरजांशी संबंधित व्यवसाय आहे जो अनेक दशकांपासून सूरु आहे.

हेही वाचा.. 10 हजारात सूरु करा हा व्यवसाय आणि कमवा 45 दिवसांत 50 हजारापेक्षा जास्त

4. चहाचा स्टॉल

चहाचा व्यवसाय हा कमी गुंतवणुकी मध्ये सुरू करता येणारा सर्वात बेस्ट व्यवसाय आहे. यासाठी एखाद्या व्यक्तीला चहाचा स्टॉल आणि चहा बनवण्याशी संबंधित सर्व आवश्यक गोष्टींची गरज असेल. हा व्यवसाय सुरू करून, तुम्ही महिन्याला एक चांगले उत्पन्न मिळवू शकता 

चहाचा स्टॉल लावण्यासाठी चांगली जागा असणे आवश्यक आहे, जसे की कार्यालये, बाजार, कॉलेज कॅम्पस आणि शैक्षणिक संस्थांजवळील जागा. या ठिकाणांच्या आधारे चहाच्या स्टॉलमधून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते.

5. हस्तकला विक्रेता (हॅण्डक्राफ्ट विक्रेता)

आजच्या युगात हस्तकलेशी संबंधित वस्तू लोकांच्या आवडीचा विषय झाला आहे. हा व्यवसाय तुम्ही घरूनही सुरू करू शकता. विविध धातूंची भांडी, रंगकाम, लाकडी भांडी, गालिचे, शाल, मातीची भांडी इत्यादी वस्तू तयार करून तुम्ही हस्तकला व्यवसाय सुरू करून दर महिना चांगले उत्पन्न मिळवू शकता.

हस्तशिल्प उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार अंतर्गत व्होकल फॉर लोकल हे कँपेनिंग सुध्दा सुरू करण्यात आले आहे. सरकारने अनेक राज्यांमध्ये हस्तकला उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याचे कामही सुरू केले आहे.

तर मित्रानो वरील हे पाच व्यवसाय कमी गुंतवणुकी मध्ये सूरु करून तुम्ही चांगल्या प्रकारे कमाई करू शकता. 

मित्रानो हा लेख आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या