Hot Posts

6/recent/ticker-posts

Goa Tourism: गोव्यातील लोकप्रिय १० पर्यटन स्थळे

 Goa Tourism:नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखात तुम्हाला गोव्यातील १० सर्वात लोकप्रिय ठिकाणांची माहिती देणार आहोत. मित्रांनो गोव्याचं नुसतं नाव जरी ऐकलं की सगळ्यांच्या मनात येतो तो समुद्रकिनारा आणि समुद्र.. खर तर प्रत्यक्षात तिथं गेल्यावर परदेशात फिरायला गेल्याचा भास होतो. मित्रानो तुमच्या दैनंदिन जीवनातील घाई-गडबडीतून विश्रांती घेऊन, तुम्हाला तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह सहलीला जायला आवडत असेलच किंवा तुमच्या हनीमूनसाठी तुम्हाला गोव्याला जायला आवडत असेल तर, गोवा हे भारतातील सुट्टीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे असे मानले जाते

Goa Tourism: गोव्यातील लोकप्रिय १० पर्यटन स्थळेभारताच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले हे देशातील सर्वात लहान राज्य आहे. गोव्याचे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन भाग आहेत. दोन्ही भागांना पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. आणि त्या उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही प्रमुख आणि लोकप्रिय ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. ती ठिकाणे खालील प्रमाणे... 

goa tourist places in Marathi


१) बागा बीच ( Baga beach Goa)


उत्तर गोव्यातील बागा बीच गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या बीचवर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स, रेस्टॉरंट्स, क्लब आणि बार पाहायला मिळतील. वॉटर स्पोर्ट्स मुळे (Water sports) बागा बीच हे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

बागा बीचवर असलेल्या अनेक रेस्टॉरंटमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या सी-फूडचा आनंद घेऊ शकता आणि ज्यांना शांत वातावरणात वेळ घालवायचा आहे त्यांच्यासाठी उत्तर गोव्यातील बागा बीच ला भेट देणे हा एक चांगला पर्याय आहे.

बागा बीच हा प्रामुख्याने बनाना राईड ( Banana ride ) आणि पॅरासेलिंग (parasailing) सारख्या खेळांसाठी ओळखला जातो. 


२) दूधसागर धबधबा ( Dhudhsagar waterfall) 


मांडोवी नदीवर ३२० मीटर उंचीवर असलेला दूधसागर धबधबा हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. हिरवाईने भरलेल्या जंगलाच्या मध्यभागी दुधासारख्या उंचीवरून कोसळणारा हा धबधबा डोळ्यांना एक प्रकारे वेगळाच आनंद देउन जातो. या धबधब्यावरून पडणारे पाणी हे दुधासारखे पांढरेशुभ्र दिसते त्यामुळेच त्याला दूधसागर धबधबा असे म्हणतात.

इथे आलेल्या पर्यटकांना धबधब्याखाली आंघोळ करण्याचा मोह आवरता येत नाहीच, शिवाय पर्यटक इथे हायकिंग आणि ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकतात. हा धबधबा भारताच्या पश्चिम घाटावर भगवान महावीर अभयारण्य आणि मोलेम नॅशनल पार्कच्या आत आहे.

दूधसागर धबधबा हा गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेला नैसर्गिक सौंदर्याचा अप्रतिम खजिना आहे. बस, कार किंवा टॅक्सी इत्यादींच्या मदतीने पर्यटक येथे जाऊ शकतात.


हेही वाचा..  वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय तर या ठिकाणी नक्कीच भेट


३) पालोलेम बीच ( Palolem beach )


पालोलेम बीच हा दक्षिण गोव्यातील एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे जो परदेशी पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. या बीचवर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी अतिशय सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकता. लोकांना त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवायला आणि येथील शांत समुद्रकिनाऱ्यावर पाण्यासोबत मजा करायला नक्कीच आवडते.

पालोलेम बीचवर रेस्टॉरंट, कॅफे, स्पा, (spa) बीच हट ( beach hut ) यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. येथे येणारे पर्यटक मच्छिमारांसोबत मासेमारीचा आनंद सुद्धा घेऊ शकतात. त्यांच्या मदतीने तुम्ही डॉल्फिन स्पॉटिंगचाही आनंद घेऊ शकता.


४) अगुआडा किल्ला ( Aguada Fort )


गोव्याची राजधानी पणजीपासून फक्त १८ किलोमीटर अंतरावर असलेला अगुआडा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. हा किल्ला १७ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता आणि त्याचे नाव देखील पोर्तुगीज शब्द अगुवा ज्याचा अर्थ पाणी आहे त्यावरून घेतले आहे.

   हा किल्ला कँडोलीम शहराच्या दक्षिणेस मांडोवी नदीच्या काठी वसलेला आहे. त्यांच्या संरक्षणासाठी हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. अगुआडा किल्ल्यावर एक लाइट हाऊस देखील बांधले गेले आहे, जे आशियातील सर्वात जुन्या लाइट हाऊसपैकी एक आहे.

लाइट हाऊसशिवाय या किल्ल्यामध्ये बंदुकीच्या खोल्या, खंदक आणि गुप्त मार्ग आहेत ज्यांचा वापर युद्धात केला गेला होता. आपल्या सौंदर्यामुळे हा किल्ला पर्यटकांना खूप आवडतो.


५) बॅसिलिका ऑफ बॉम येशू (Basilica of Bom Jesus)


जुन्या गोव्यात असलेल्या या चर्चला ‘ओल्ड चर्च’ म्हणूनही ओळखले जाते. हे चर्च युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे भारतातील प्रसिद्ध चर्चपैकी एक असून जगभरातील ख्रिश्चन लोक या चर्चवर विश्वास ठेवतात.

     या चर्चचे बांधकाम २४ नोव्हेंबर १५९४ रोजी सुरू झाले व १५ मे १६०५ रोजी त्याचे बांधकाम पूर्ण झाले. डोरिक, कोरिंथियन आणि संमिश्र शैली चर्च च्या बांधकामात बारकाईने वापरल्या गेल्या आहेत. बॉम जीझस बॅसिलिका चर्चमध्ये

 सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र अवशेष आहेत, जे गोव्याचे संरक्षक संत होते. सेंट फ्रान्सिस झेवियर हे २५५२ मध्ये मरण पावले.


६) मंगेशी मंदिर गोवा ( Mangeshi Mandir Goa)


गोव्याची राजधानी पणजीपासून २१ किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगेशी गावात हिंदू धर्माचे पवित्र मंगेशी मंदिर बांधले आहे. हे मंदिर गोव्यातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे जिथे दरवर्षी हजारो पर्यटक आणि भाविक येतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना ड्रेस कोड पाळावा लागतो.

हे मंदिर १५६० मध्ये बांधले असून या मंदिराचे मुख्य दैवत श्री मंगेश हे भगवान शिवाचे अवतार आहेत. या मंदिराचे सर्व खांब दगडाचे असून मंदिराच्या मधोमध एक मोठी दीपमाळ असून तेथे अनेक दिवे एकाच वेळी प्रज्वलित केले जातात.

हेही वाचा.. पावसाळ्यात पर्यटनासाठी जाणार असाल तर कोल्हापूर मधील ह्या धबधब्यावर नक्कीच जा..


७) अंजुना बीच ( Anjuna beach)


अंजुना बीच गोव्यातील लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. खासकरून परदेशी पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. अंजुना बीचवर, तुम्ही अनेक सुंदर दृश्यांचा तसेच जेट स्की, (jet ski)पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, बम्पिंग राइड (Bumping ride) आणि वॉटर स्कूटिंग (water scooting) यासारख्या खेळांचा आनंद घेऊ शकता.

या बीचवर अनेक रेस्टॉरंट्स, कॅफे, बार, क्लब आणि स्पा (spa) आहेत. येथील म्हापसा मार्केट पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्ही येथे सुंदर कपडे, दागिने, पिशव्या, मसाले, चादरी इत्यादी खरेदी करू शकता.


८) चापोरा किल्ला (Chapora Fort)


चापोरा किल्ला हा राजधानी पणजीपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला चापोरा नदीच्या काठावर बांधला आहे, म्हणून त्याला चापोरा किल्ला म्हणतात. १८ व्या शतकात आदिलशाहने चापोरा किल्ला बांधला होता. या किल्लावरील वातावरण हे शांत असल्याने पर्यटकांचे हे आवडते ठिकाण बनले आहे. या किल्ल्याशी संबंधित एक मनोरंजक गोष्ट म्हणजे हा किल्ला २००१ मध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या "दिल चाहता है" चित्रपटाचे शूटिंग या किल्ल्यावर करण्यात आले होते तेंव्हापासून हा किल्ला अधिकच लोकप्रिय झाला.


९) कलंगुट बीच ( Calangute Beach)


उत्तर गोव्यातील कलंगुट शहरात असणारा कलंगुट बीच हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा गोव्यातील सर्वात जास्त गर्दीच ठिकाण तसेच व्यावसायिकदृष्ट्या चांगल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या आसपास देश-विदेशातील हजारो पर्यटक येथे भेट देत असतात आणि येथे आनंद लुटण्यासाठी येत असतात.

या विशाल समुद्रकिनाऱ्यावर, तुम्ही बनाना राईड, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, ( Paragliding) बंप राइड, वॉटर सर्फिंग, ( Water Surfing) कॅटामरन सेलिंग ( Catamaran sailing) यासारख्या मजेदार वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. दरवर्षी डिसेंबर महिन्यात ख्रिसमस व ३१ डिसेंबर तसेच न्यू इयर साठी मोठे सेलिब्रेशन पार्टी सुद्धा या बीच वर आयोजित केलेल्या असतात. ज्यामध्ये अनेक मोठमोठे सेलिब्रिटी येतात.


१०) कॅथेड्रल चर्च ( Cathedral Church)


हे चर्च गोव्यातील सर्वात सुंदर चर्चांपैकी एक आहे, जे १५६२ मध्ये राजा डोम सेबॅस्टिओच्या काळात मुस्लिम सैन्यावर पोर्तुगीजांच्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले गेले होते. हे चर्च सेंट कॅथेड्रलला समर्पित आहे. भारतातील सर्वात मोठे चर्च म्हणुन सुद्धा हे चर्च प्रसिद्ध आहे. त्याच्या सौंदर्य आणि कलात्मक बांधकाम शैलीमुळे, युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे. कॅथेड्रल चर्चमध्ये पाच घंटा आहेत त्यापैकी सोन्याची घंटा ही सर्वात मोठी घंटा आहे. याशिवाय या चर्चमध्ये चौदा सुंदर वेद्याही बांधल्या आहेत.


- गोव्यातील अन्य काही पर्यटन स्थळे 

- वागेटोर बीच (Vagator beach)

- आरंबोल बीच ( Aarambol beach)

- सिंक्वेरिम बीच 

- बटरफ्लाय बीच ( butterfly Beach)

- काबो डी रामा किल्ला

- नेव्हल एव्हिएशन म्युझियम


मित्रानो गोव्यात जायचे नियोजन झाल्यास तुम्ही रस्ता मार्गाने, रेल्वे मार्गाने, हवाई मार्गाने किंवा समुद्री मार्गाने सहजपणे जाऊ शकता. जर आपण रस्तेमार्गा lबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही ठिकाणाहून स्वतः च्या वाहनाने सहजपणे गोव्याला जाऊ शकता किंवा सरकारी किंवा खाजगी बसच्या मदतीने सुद्धा गोव्यात पोहोचू शकता.

गोवा हे देशातील प्रमुख शहरांशीही रेल्वेने जोडलेले आहे. त्याचबरोबर वास्को द गामा जवळ असलेले दाबोलिम विमानतळ हे गोव्याचे सर्वात महत्वाचे विमानतळ आहे, जे राजधानी पणजीपासून सुमारे २९ किलोमीटर अंतरावर आहे. हे देशातील विविध प्रमुख विमानतळांशी जोडलेले आहे.

गोव्याला सागरी मार्गानेही पोहोचता येते.मुंबईपासून पणजीपर्यंत बोट सेवाही मिळेल. 


गोव्यातील राहण्याची सोय

मित्रांनो गोवा हे देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे . गोव्यामध्ये एका दिवसात येथील सर्व पर्यटन स्थळांना भेट देणे खूप कठीण आहे, त्यामुळे तुम्हाला येथे मुक्काम करणे गरजेचं आहे.

मित्रांनो गोव्यामध्ये कमी बजेटपासून राहण्या-खाण्यासाठी अनेक महागडे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. येथे तुम्ही तुमच्या बजेटनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन हॉटेल्स बुक करू शकता आणि कोणत्याही काळजीशिवाय प्रवासाचा आनंद घेऊ शकता.


धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या