Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा समाजासाठी १५ लाख रूपये बिनव्याजी कर्ज योजना !

आण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मिळवा बिनव्याजी १५ लाख रूपये कर्ज ! असा करा अर्ज Aannasaheb patil Loan
Aannasaheb Patil Loan: महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.

राज्यातील बेरोजगारी लक्षात घेऊन, मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे,त्यांना व्यवसायामध्ये नवीन झेप घेता यावी,व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय (Bussiness Loan ) उभारणीसाठी कर्ज देण्यात येते. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा... राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता !

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यामाध्यमातून तीन प्रकारच्या योजना राबवतात 

1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

2. गट कर्ज व्याज परतावा योजना

3. गट प्रकल्प कर्ज योजना


ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज (Loan) मंजूर केले जाते तसेच लाभार्थ्याने कर्जाचे हफ्ते वेळेत भरल्यास त्या हफ्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साहाय्याने जमा करण्यात येते.

या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी ४ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो.

गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत १० लाख ते ५९ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते व कर्जाचा परतफेड कालावधी ५ वर्षासाठी निर्धारित केले गेलेला आहे.या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, LLP FPO अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

हेही वाचा.. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना विनातारण ५ ते २५ लाख कर्ज ! असा करा अर्ज

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

१. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा

२. लाभार्थी वयोगट मर्यादा पुरुषांसाठी ५० तर महिलांसाठी ५५ वर्ष एवढे असावे.

३. लाभार्थीने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

४. दिव्यांगाकरिता, दिव्यांग असल्याचे पमाणपत्र सादर करणे आवश्यक.

५. एका व्यक्तीला केवळ एका योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

६. बँक खाते आधारकार्ड सोबत लिंक केलेले असावे.

७. महामंडळाच्या ऑनलाईन वेबपोर्टलवर नाव नोंदणी केलेली असावी.

८. लाभार्थी कोणत्याही बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.


योजनेच्या अटी

१-सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

२-अक्षम मापदंडाच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

३-एका व्यक्तीला फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.

४-दिव्यांगांकरिता अर्ज दाखल करत असल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

५-योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदारास शासनाने दिलेलाच जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशनकार्डची प्रत (पाठपोट कुटुंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य आहे.

६-व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रति माहे असणे अनिवार्य आहे.

७-जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.

८-उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे ९-अनिवार्य आहे.

अर्जदार कोणत्याची बँकेचा थकबाकीदार नसावा.

१०-बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे.

११योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या आधिकारीक वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

१३-उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सर्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.

१४-गट प्रकल्प योजनेअंतर्गत किमान एक भागीदार / उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता १०वी उत्तीर्ण असावी.

१५-गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार गटाच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या १०% रक्कम महामंडळाचा हिस्सा वाटप करण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे.


अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे:

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन (नाव नोंदणी) करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात. 


१) आधार कार्ड

२) रेशनकार्ड 

३) पॅन कार्ड 

४) उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाख पर्यंत आवश्यक)

५) जातीचा दाखला 

६) प्रकल्प अहवाल

ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केल्यानंतर, प्रत्यक्ष बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे:

१. आधार कार्ड 

२. मतदार कार्ड / पण कार्ड / वीज बिल

३. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स

४. बँक खाते / स्टेटमेंट

५. सिबिल रिपोर्ट

६. व्यवसाय प्रकल्प अहवाल

७. व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

बँकेतून कर्ज मंजूर झाल्यानंतर, व्याज परताव्यासाठी अर्जदाराने महामंडळास (ऑनलाईन) सादर करावयाची कागदपत्रे:

१. बँक कर्ज मंजुरी पत्र 

२. लोन खाते बँक स्टेटमेंट 

३. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स

४. व्यवसाय प्रकल्प अहवाल 

५. व्यवसायाचा फोटो

हेही वाचा... शरद पवार ग्राम समृद्धी गाय गोठा योजना. असा करा अर्ज

अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा:

• लाभार्थीने सर्वप्रथम Udyog.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन नाव नोंदणी करावी लागते व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक असते. अर्ज सादर केल्यानंतर लाभार्थास सशर्त ऑनलाईन हेतू पत्र (Letter of Intent) दिले जाते. या पत्राच्या आधारे लाभार्थीने बँकेकडे कर्ज मंजूर करून घ्यावे.


• अर्जदाराने महामंडळाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करते वेळीस, आधारलिंक मोबाईलवर OTP द्वारे, मोबाईल ॲप द्वारे नोंदणी करावयाची असते. यासाठी सध्याचा वापरात असलेला मोबाईल नंबर, आधार क्रमांकासोबत अद्यावत ( LINK ) करावा, कारण नोंदणी करताना सदरचा OTP नमूद केल्याशिवाय नोंदणी प्रक्रीया पूर्ण होऊ शकत नाही.


• अर्जकर्त्याने अटी व शर्ती मंजूर असल्याबाबतचे शपथपत्र ऑनलाईन फॉरमॅटमध्ये भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.


• लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.


अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाईन नाव नोंदणी तसेच, अर्ज सादर करण्यासाठी इथे क्लिक करा.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या