Travel: बर्याच प्रतीक्षेनंतर पावसाने आता जोमदार हजेरी लावलीय. सगळीकडेच आता उत्साहाचं वातावरण दिसतंय. तुमच्यापैकी काहींनी आता पिकनिकची तयारी सुरू केली असेल.. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील काही मनमोहक डेस्टीनेशन्स जी तुम्ही पावसाळ्यात पाहायलाच हवीत...
लोणावळा / खंडाळा
पुणे - मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे असलेली विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूपच मजा वाटते. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपास पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे आहेत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.
सोने चांदी झाले स्वस्त जाणून घ्या... येथे क्लिक करा
ताम्हिणी घाट
मुंबई - गोवा महामार्गावर मुंबईपासून 140 कि.मी वर असणारा हा घाट अनेकांचं पावसाळ्यातील आवडतं ठिकाण आहे. जर तुम्हाला निसर्ग आणि साहसी पर्यटन हे दोन्ही आवडतं.. तर इथे तुम्ही जायलाच हवं. येथील खोल हिरव्या दऱ्या, मुळशी धरण, कडेलोटावरुन पडणारे छोटेमोठे धबधबे तुम्हाला आकर्षित करतील. आणि सोबतीला जवळच 30 कि. मी वर सिंहगड किल्ला आहे. तेव्हा एकदा इथे नक्की भेट द्या
पाचगणी
पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि.मी अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत
तर मग करताय ना नियोजन या वीकेंडला एन्जॉय करण्याचे.

0 टिप्पण्या