Hot Posts

6/recent/ticker-posts

पावसाळ्यात कोल्हापूरातील या धबधब्यावर नक्की जा

पावसाळ्यात पर्यटनासाठी जाणार असाल तर कोल्हापूर मधील ह्या धबधब्यावर नक्कीच जा..

 पावसाळी पर्यटन: कोल्हापूर शहरापासून अवघ्या पंचावन्न किलोमीटर अंतरावर राऊतवाडी धबधबा आहे, तर राधानगरी मधून अवघ्या साडेसहा किलोमीटर अंतरावर, कोणतीही गाडी जाईल असा व्यवस्थित रस्ता आहे. कंटिन्यू पाऊस सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्ये हा धबधबा चालू होतो. पर्यटकांची ये-जा चालू होते. या धबधब्याची उंची साधारण दीडशे फूट आहे. एवढ्या उंचावरून पडणारे पाण्याचे मनमोहक दृश्य पाहून मन थक्क होऊन जाते. पर्यटक अतिशय आनंदाने त्या मोहक वातावरणाचा आस्वाद घेतात.

शरद पवार यांना धक्का विधानसभेचे ७ आमदार अजित पवार यांच्या सोबत.. येथे क्लिक करा

पर्यटकांना राहण्यासाठी धबधब्यापासून अगदी शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरती राहण्याची उत्तम सोय आहे. येथे रेस्ट हाउसची सुविधा एवढी भारी आहे की प्रत्येकाला तिथेच राहावं असं वाटतं. रेस्ट हाऊस मधून लक्ष्मी तलावाच्या (राधानगरी धरण) बॅक वॉटर चे दर्शन होते. धबधब्याकडे जात असतानाच मध्ये “राधानगरी डॅम” ही लागतो. सिझनमध्ये जवळजवळ साडेतीन ते चार हजार पर्यटक ह्या धबधब्यावर आनंद घेण्यासाठी येथे येत असतात.

राजस्थानच्या जयपूरमध्ये १५ मिनिटांत तीन वेळा भूकंप.. येथे क्लिक करा 

पाण्यात भिजण्याचा आनंद घेतल्यानंतर तुम्ही जेवण करण्यासाठी गेलात, तर तुम्हाला तेथील प्रसिद्ध दूध आमटी, तांबडा-पांढरा रस्सा व गावरान मटन यांची चव चाखायला मिळेल. लोकांच्या सिक्युरिटीचे सुद्धा खूप चांगले असे व्यवस्थापन असते. जर काही अपघात झाला तर “बायसन नेचर क्लब” व तिथे नेमलेले कर्मचारी प्राथमिक उपचार करून दवाखान्यात नेण्याची सोय करतात. गेल्या काही वर्षात संरक्षणाच्या बाबतीत तिथे खूप सुधारणा झालेली आहे. अशा सुंदर ठिकाणी प्रत्येकाने नक्की एकदा तरी जायलाच हवं आणि तिथल्या अश्या सौंदर्याचा नक्कीच आस्वाद घ्यायला हवा...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या