Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्नाटक मधील प्रसिद्ध 10 पर्यटन स्थळे

Karnataka tourism : भारतातील सर्वोत्तम तीर्थक्षेत्रांमध्ये कर्नाटकचे महत्त्वाचे स्थान आहे. कर्नाटक हे भारतातील असे एक राज्य आहे ज्याठिकाणी अनेक तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळे आहेत. येथील धार्मिक स्थळे देशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकाना आकर्षित करतात. जर तुम्ही देखील कर्नाटकातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला कर्नाटकातील 10 प्रमुख तीर्थक्षेत्रांची माहिती देणार ​​आहोत जिथे तुम्ही एकदा भेट द्यायलाच हवी.

कर्नाटक मधील प्रसिद्ध 10 पर्यटन स्थळे


कर्नाटकातील प्रसिद्ध 10 पर्यटन स्थळे - Karnatak Madhil Pramukh Paryatan Sthal In Marathi

कर्नाटकात मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारांसह अनेक तीर्थक्षेत्रे आहेत ज्यांना दरवर्षी लाखो यात्रेकरू भेट देत असतात. कर्नाटकच्या इतिहासात आणि कलेमध्येच नाही तर धर्म आणि जातीतही विविधता आहे. कर्नाटक राज्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा ते सुंदर निसर्ग, रमणीय खाद्यपदार्थ ते शांत समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळांनी परिपूर्ण आहे. नैसर्गिक आकर्षणांनी समृद्ध असलेले कर्नाटक हे कूर्ग कॉफीच्या मळ्यासाठी आणि चिकमंगळूरमधील अवशेषांसाठी जगप्रसिद्ध आहे.


कर्नाटकचा इतिहास –History Of Karnataka In Marathi 

बदामी चालुक्य, गंगा, नंदा आणि मौर्य यांसारख्या राजघराण्यांच्या उदय आणि शेवट ते मराठ्यांनी मुघलांकडून कर्नाटक जिंकल्यापर्यंत अशा अनेक ऐतिहासिक घटना कर्नाटकात घडल्या आहेत. 1799 ते 1818 दरम्यान टिपू सुलतानचे राज्य होते, त्यानंतर कर्नाटक ब्रिटिश राजवटीत आले. 20 प्रदेश एकत्र विलीन करण्यासाठी 1905 ते 1920 पर्यंत खूप संघर्ष सुद्धा झाला होता.


१) हंपी –Hampi Karnatak Madhil Pramukh Paryatan Sthal In Marathi 

जर तुम्हाला इतिहास जाणून घेण्यात रस असेल आणि तुम्ही अशा ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर हंपी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. हंपी हे कर्नाटकातील एक प्राचीन शहर आहे आणि त्याचा उल्लेख रामायणातही आढळतो. ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. त्याला किष्किंधा नावाने संबोधले जात असे. स्मारकांचे शहर म्हणुन प्रसिध्द असलेले हंपी बेंगळुरूपासून 350 किमी अंतरावर आहे.

हेही वाचा... गोव्यातील दहा लोकप्रिय पर्यटन स्थळे

हम्पी शहर अनेक प्रकारच्या आणि आकारांच्या आश्चर्यकारक दगडांनी वेढलेले आहे. भव्य मंदिर, ऐतिहासिक अवशेषांची रचना आणि खडकांनी वेढलेले हे अतिशय आकर्षक ठिकाण आहे. त्यामूळे येथील पर्यटन प्रत्येक पर्यटकाला एक अविस्मरणीय अनुभव देते आणि एक अविस्मरणीय प्रवासाची एक अमिट छाप सोडते, ज्याचे आकर्षण येथे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा निर्माण करते. इतिहासकारांच्या मते, हम्पी-विजयनगर हे 15 व्या शतकापर्यंत बीजिंग नंतर जगातील आणि भारतातील दुसरे सर्वात मोठे आणि समृद्ध शहर होते. 1565 मध्ये, मुस्लिम राजवटीनी आक्रमण केले, लुटले आणि नष्ट केले होते.


२) श्रीरंगपट्टणा - Shrirangpatna Best Place To Visit In Karnataka In Marathi 

म्हैसूरपासून १८ किलोमीटर अंतरावर कावेरी नदीच्या मध्यभागी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणा हे अंड्याच्या आकाराचे बेटाचे शहर आहे. या बेटावर बांधलेले श्री रंगनाथस्वामी मंदिर हे कर्नाटकातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जे हजारो भाविकांना आकर्षित करते. भगवान विष्णूला समर्पित असलेले हे मंदिर भारतातील सर्वात मोठे मंदिर आहे.


एकेकाळी हैदर अली आणि टिपू सुलतान यांची राजधानी असलेले हे शहर अनेक ऐतिहासिक स्थळांचेही घर आहे. मंदिरे, समाधी, लष्करी डेपो आणि राजवाडे यांसारख्या पर्यटन आकर्षणांच्या मनोरंजक मिश्रणासह, श्रीरंगपट्टणाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व देखील आहे. जर तुम्ही कर्नाटकातील कोणतेही ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ शोधत असाल तर तुम्ही येथे अवश्य भेट द्या.


३) म्हैसूर -Mysore Karnataka Madhil Pramukh Paryatan Sthal In Marathi 

म्हैसूर हे कर्नाटकातील म्हैसूर राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण ठिकाणांपैकी एक आहे कारण ते सात शतके वोडेयार राजवटीची राजधानी होती. याठिकाणी दरवर्षी 2.5 दशलक्षाहून अधिक पर्यटक भेट देत असतात. म्हैसूरमध्ये तुमच्यासाठी ललिता महल, जगमोहन पॅलेस, वृंदावन गार्डन् आणि म्हैसूर प्राणीसंग्रहालय यांसारखी अनेक आकर्षणे आहेत.


तुम्ही या शहरात खरेदीसाठी देखील जाऊ शकता. तुम्ही येते खादी , अगरबत्ती, चंदन उत्पादने इत्यादीसारख्या प्रसिद्ध गोष्टी खरेदी करू शकता. तुमच्या ट्रीप मध्ये जगप्रसिद्ध म्हैसूर पाक खाण्यास विसरू नका.


४) शिमोगा -

कर्नाटकातील शिमोगा शहर हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. पौराणिक काळातही हे शहर अनेक राजांची पहिली पसंती असायचे. येथे असलेली पौराणिक मंदिरे, हिरवेगार अभयारण्य आणि नैसर्गिक झरे हे शिमोगाचे महत्त्व वाढवातात.

हेही वाचा.. ऑनलाईन पैसे कमावण्याचे खात्रीशीर मार्ग 

कर्नाटकातील शिमोगा हे एक असे पर्यटन स्थळ आहे, जे निसर्गप्रेमींना निसर्गरम्य दृश्यांनी भरलेल्या शांत वातावरणासाठी आकर्षित करते. अशी अनेक अतुलनीय ठिकाणे येथे आहेत, जिथे भेट दिल्यानंतर तिथून लवकर परत यावेसे वाटत नाही.


५) बेंगलोर - Bangalore Karnataka Madhil Pramukh Paryatan Sthal In Marathi 

बेंगलोर हे भारताची सिलिकॉन व्हॅली बनण्याआधी कर्नाटकातील राजकारण, व्यापार आणि व्यवसायाचे केंद्र होते. कर्नाटकातील ऐतिहासिक ठिकाणांच्या यादीत बंगलोर चा आणखी एक उल्लेखनीय उल्लेख आहे तो म्हणजे राजवाडे, किल्ले आणि इतर अनेक ठिकाणे. बेंगलोर हे राजकीय, सांस्कृतिक, पारंपारिक आणि धार्मिक इतिहासाची झलक देते. एक मनोरंजक इतिहास असण्याव्यतिरिक्त, बेंगलोरमध्ये भेट देण्याची ठिकाणे ही आधुनिक आणि शहरी राहणीमानाची ठिकाणे आहेत.


६) बदामी–Badami Karnataka madhil best Ani sundare Paryatan Sthal In Marathi

बदामी किल्ला हे कर्नाटकातील अद्वितीय ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे जिथे तुम्हाला उत्कृष्ट मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू आढळतील. मेगॅलिथिक डॉल्मेन्स हे पुरावे आहेत की हे शहर प्रागैतिहासिक काळात वसलेले होते. महाकुटाची अद्वितीय दगडी मंदिरे हे या ठिकाणी भेट देण्याचे मुख्य कारण आहे. लाल वाळूचा खडक, बदामी किल्ला आणि अगस्त्य सरोवर ही बदामी लेण्यांची इतर प्रमुख आकर्षणे आहेत. रॉक क्लाइंबिंग साहसी उत्साही लोकांसाठी सर्वात प्रसिद्ध खेळापैकी एक आहे.


७)ऐहोल दुर्गा मंदिर –Ehole Madhil Durga Mandir Karnataka che Dharmik Sthal In Marathi 

ऐहोल हे कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे, ज्याला कर्नाटकचा मंदिर परिसर म्हणूनही ओळखले जाते. येथे चालुक्य साम्राज्याची 100 हून अधिक कोरीव मंदिरे आहेत आणि हे मंदिर युनेस्को अंतर्गत प्रमुख ऐतिहासिक स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता मार्गावर आहेत.


८) शृंगेरी - Sringeri Best Place To Visit In Karnataka In Marathi 

 श्री क्षेत्र शृंगेरी हे कर्नाटकातील चिक्कमेंगलोर जिल्ह्यात वसलेले एक लहान डोंगरी शहर आहे. हे तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते जे शंकराचार्यांनी 9व्या शतकात बांधले होते. ऐतिहासिक नोंदीनुसार, बिदर किल्ल्यावर असे मानले जाते की आदि शंकराचार्यांनी 12 वर्षे येथे राहून आपल्या शिष्यांना शिकवले. यासोबतच येथे अनेक मंदिरे आणि ऐतिहासिक अवशेष देखील आहेत ज्यांचा शोध घेता येतो. शृंगेरी या छोट्या शहरात 40 हून अधिक मंदिरे आहेत.


९) बिदर -Bidar Karnataka Madhil Aakarshak Paryatan Sthal In Marathi 

ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, बिदर हे दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक शहर आहे जे त्याच्या आकर्षक इतिहास, वास्तुकला आणि प्राचीन कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. बिदर हे एकेकाळी चालुक्य, अलाउद्दीन खिलजी आणि मुहम्मद बिन तुघलक यांसारख्या अनेक महान राजवटीचे सत्तेचे केंद्र होते, या सर्वांनी बिदरसाठी समृद्ध वारसा असलेला महान इतिहासाचा वारसा सोडला.


अनेक मंदिरे, मशिदी आणि समाधी यामुळे या शहरात दरवर्षी भरपूर पर्यटक येत असतात. बिदरच्या पूर्वेला तेलंगणातील निजामाबाद आणि मेडक जिल्ह्यांनी, पश्चिमेला महाराष्ट्रातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांनी, उत्तरेला महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा आणि दक्षिणेला गुलबर्गा जिल्ह्याने वेढलेले आहे. बिदरला ऐतिहासिक महत्त्व आहे, आणि ते कर्नाटकातील महत्त्वाच्या वारसा स्थळांपैकी एक आहे.


१०)सोमनाथपूर –Somnathpura Best Place To Visit In Karnataka In Marathi 

कावेरी नदीच्या काठावर वसलेले सोमनाथपुरा हे सुंदर शहरांपैकी एक मानले जाते. होयसळांच्या सुंदर वास्तुकला जतन करण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे ज्याला प्रसन्न चेन्नकेसेवा मंदिर किंवा केशव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे 1258 ई. स मध्ये बांधले गेले येथे एक वैष्णव हिंदू मंदिर आहे जिथे भगवान कृष्णाची पूजा केली जाते.

हेही वाचा... ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी काय उपाय करावेत ?

होयसाळ साम्राज्याच्या राजांनी बांधलेल्या 1500 मंदिरांपैकी हे मंदिर आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद असलेले हे ठिकाण कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. भगवान शिवाच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानेच भक्तांचे सर्व दु:ख, वेदना दूर होतात आणि भगवान सोमनाथाची पूजा केल्याने भक्तांचे कुष्ठ आणि क्षयरोग बरा होतो, अशी येते श्रद्धा आहे.


कर्नाटकातील पर्यटन स्थळांना भेट देण्याची चांगली वेळ - Best Time To Visit Karnataka In Marathi 

जर तुम्ही कर्नाटकला भेट देणार असाल तर ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान कर्नाटकला जाण्यासाठी योग्य वेळ आहे. पावसाळ्यात कर्नाटकातील काही भागात भरपूर पाऊस पडतो, तर येथील तापमान जास्त असते. त्यामुळे हिवाळ्यात कर्नाटक पर्यटन स्थळांचा आनंद घेणे चांगले. धबधबे बघायला किंवा ट्रेकिंगला जायचे असेल तर पावसाळ्यातही इथे फिरू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या