Hot Posts

6/recent/ticker-posts

चार स्टार्टअप व्यवसायातून माहिना लाखो रुपये कमवा

हे चार स्टार्टअप व्यवसाय करून माहिना लाखो रुपये कमवा

Startup Bussiness idea in Marathi : मित्रानो एखाद्या व्यवसायातून आयुष्यभर लाखो कमवायचे राहायचे आहे ? तर मित्रानो ह्या  4 स्टार्टअप आयडिया तुम्हाला कमी गुंतवणुकीतही चांगला फायदा कायमस्वरूपी देतील.मित्रानो कोरोनाच्या काळात अनेक व्यवसाय बंद पडले. करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. या सर्व घडामोडीमध्ये  एक गोष्ट बदलली, ती म्हणजे नोकरी आणि व्यवसायाकडे तरुणांचा बगण्याचा विचार. आताचे तरुण नोकरीपेक्षा स्वतःच्या व्यवसायाचा विचार करू लागले आहेत.
अशा तरुणांसाठी आज आम्ही 4 सर्वोत्तम स्टार्टअप संकल्पना सांगणार आहोत. या स्टार्टअप वर काम करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. काही कंपन्यांच्या अहवालानुसार, गेल्या 15 वर्षांत भारतात 100 हून अधिक युनिकॉर्न (असूचीबद्ध कंपन्या ज्यांचे मूल्य एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे) निर्माण झाले आहेत. कोरोना साथीच्या रोगानंतर स्टार्टअप्स वेगाने वाढले आहेत. त्यामुळे रखडलेला बाजार पुन्हा वेगाने वाटचाल करत आहे. 

आज किंवा भविष्यासाठी सर्वोत्तम स्टार्टअप कल्पना..
1- शैक्षणिक तंत्रज्ञान (education technology) 

कोरोना महामारीने 2020 मध्ये शिक्षण पूर्णपणे बदलले. शाळा कॉलेज बंद असल्यामुळे  देशात प्रथमच, बहुतांश अभ्यास ऑनलाइन पद्धतीने सूरु झाले. अशा परिस्थितीत एड टेक क्षेत्रात झपाट्याने तेजी आली आहे. Byju's ते Unacademy पर्यंत शेकडो प्लॅटफॉर्म निर्माण झाले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा वैयक्तिक स्तरावर एक उत्तम स्टार्टअप म्हणुन हा पर्याय निवडू शकता.

त्यामध्ये अपस्किलिंग ( Upskilling) वर लक्ष केंद्रित केल्यास 
 जसे तुम्ही शाळा कॉलेज ह्यांच्या बरोबर स्पर्धा करू नका. कारण तिथे आधीच मोठे लोक सेट झालेले असतात. तुम्ही तुमची कौशल्ये वाढवणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. यामध्ये प्रथम तुम्ही अशा लोकांना टार्गेट करू शकता जे शाळा-कॉलेजमध्ये चांगले काम करू शकले नाहीत.

त्यामध्यें त्यांना इंग्रजी बोलणे, व्यक्तिमत्व विकास, विपणन कौशल्ये वाढविण्यासाठी ऑनलाइन कोर्स, जे नोकरी मिळविण्यासाठी उपयुक्त आहे. संघ व्यवस्थापन. यासारखी अनेक सॉफ्ट स्किल्स असतात, जी तुम्ही तेथील लोकांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने शिकवू शकता. तसेच ज्या गोष्टीमुळे  आयुष्य बदलणार नाहीत पण त्यामुळे आयुष्य सुधारतील. उदाहरणार्थ, छंदावर आधारित शिक्षण, मनोरंजनावर आधारित शिक्षण जसे डान्स क्लास, फिटनेस ट्रेनिंग, म्युझिक क्लास यासारख्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींसाठी सर्व काही स्वतः करण्याऐवजी त्याचे व्यासपीठ विकसित करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून त्यामधून चांगला इन्कम सोर्स पुढें जाऊन तयार होऊ शकतो.

2. गुंतवणुक सल्लागार ( investment Advisor)

दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे गुंतवणुक सल्लागार. सद्ध्याच युग अस आहे की अनेक क्षेत्रामधील लोक ज्यांना भरपूर  पैसे कसे कमवायचे आणि त्याची चांगल्या प्रकारे गुंतवणुक करायला शिकायचे आहे. यामध्ये तरुणही येतात आणि ज्येष्ठ नागरिकही येतात. नोकरी करणाऱ्या तरुणांना गुंतवणुकी संबंधित गोष्टी जाणून घेण्यात खूप रस असतो. जर तुम्ही या क्षेत्राशी संबंधित असाल, तर तुम्ही या क्षेत्राशी संबंधित एक व्यासपीठ तयार करून स्टार्टअप सूरु करू शकता.

3. अन्न आणि कृषी तंत्रज्ञान (Food and Agri tech)

अन्नच नसेल तर काहीच सुरळीत राहणार नाही. सद्ध्या बाजारात अनेक Food dilivery करणाऱ्या कंपन्या आहेत. परंतु या क्षेत्राशी संबंधित सर्वोत्तम कल्पना म्हणजे क्लाउड किचन. जर तुम्ही तुमच्या घरच्या जेवणाला चांगली चव देत असाल तर काही वेळात तुमचा ग्राहकवर्ग तयार होईल. म्हणूनच तुम्ही वैयक्तिक स्तरावर क्लाउड किचन सुरू करू शकता. क्लाउड किचनची साधी कल्पना अशी आहे की, तूम्ही तुमच्या घरी अन्न शिजवा आणि फूड डिलिव्हरी लोक तुमचे अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवतील.

4. गेमिंग (Gaming)

हे एक असे क्षेत्र आहे जे सर्वांत वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. लुडो हा भारतातील प्लेस्टोअरवरील सर्वात मोठा ऑनलाइन गेम आहे, जो प्रत्येकाने त्यांच्या लहानपणी खेळला आहे. म्हणूनच कधी कधी छोट्या सुरुवातीपासून मोठ्या गोष्टी घडत असतात. म्हणूनच तुम्हीसुद्धा गेमवरही काम करू शकता. हा एक उत्तम स्टार्टअप म्हणून त्याची सुरुवात करू शकतो. यूट्यूबवर असे बरेच लोक आहेत जे केवळ गेमच्या पुनरावलोकनातून हजारोंची कमाई करत आहेत. तर मित्रानो कसा वाटला आजचा लेख आवडला असेल तर नक्कीच शेअर करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या