Hot Posts

6/recent/ticker-posts

फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय ?

Forex Trading in India : फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय ? फॉरेक्स ट्रेडिंग कसे काम करते
Forex Trading in India: तुम्हाला फोरेक्स ट्रेडिंग माहीत नसेल तर आज आपण या लेखात फॉरेक्स बद्दल महिती पाहू. फॉरेक्स ट्रेडिंग हा एक चांगला नफा कमाण्‍याचा किंवा गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळवायचा(Earn money) एक उत्तम मार्ग आहे. फॉरेक्स विषयी समजून घेण्याआधी आपल्याला माहीत पाहिजे की प्रत्येक देशाचे एक स्वतंत्र चलन असते, आणि प्रत्येक राष्ट्राचे चलन एकमेकांच्या तुलनेत मूल्याच्या आधारावर कमकुवत आणि मजबूत असते. जागतिकीकरणाच्या या युगात संपूर्ण जगात कुठेही व्यवसाय करता येतो. आणि हे सर्व इंटरनेटमुळे शक्य झाले आहे. (Forex trading for beginners)

हेही वाचा.. कोल्हापूर जिल्हा पुराच्या छायेखाली! पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

आज प्रत्येक घरात बसून तो डॉलर, युरो, पौंड अशा अनेक परकीय चलनामध्ये व्यवहार करु शकत आहेत या लेखात आम्ही आपले लक्ष फक्त फॉरेक्स ट्रेडिंगवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करू. कारण सध्या फॉरेक्स ट्रेडिंग हे कमाईचे (Earning) चांगलें साधन बनू शकते. परंतु हे काम नोंदणीकृत( Registered) फॉरेक्स ब्रोकरद्वारेच करता येते. 


फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय ? 

फॉरेक्स ट्रेडिंगमधील पहिला शब्द म्हणजे फॉरेक्स म्हणजे परकीय चलन. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे वेगवेगळ्या विदेशी चलनांचा एकमेकांमध्ये व्यापार करणे, म्हणजेच या प्रक्रियेअंतर्गत, विविध देशांच्या चलनांमध्ये त्यांच्या घटत्या आणि वाढत्या मूल्यामुळे व्यापार होतो. परदेशातून कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो सौदा खरेदी करण्यासाठी त्या देशाच्या चलनाची आवश्यकता असू शकते. ( Forex trading in Marathi)

एखादी व्यक्ती सुट्टीवर गेली असेल, किंवा परदेशातून काही खरेदी करू इच्छित असेल, किंवा एखाद्या सेवेसाठी पैसे देत असेल, इत्यादी, त्याला त्या देशाचे चलन आवश्यक आहे. उदाहरणार्थ: यूएस ( US) मध्ये असलेल्या कॉलेजची फी भरण्यासाठी एखाद्याला यूएस डॉलर्सची आवश्यकता असू शकते, कारण यूएस मध्ये असलेले कॉलेज भारतीय रुपयांमध्ये फी स्वीकारणार नाही. म्हणून, डॉलरमध्ये पेमेंट करण्यासाठी, सर्व प्रथम व्यक्तीला यूएस डॉलर्स खरेदी करावे लागतील.

हे विकत घेण्यासाठी त्या वेळी निर्धारित केलेल्या डॉलरच्या मूल्यावर आधारित भारतीय रुपयात (INR) पैसे द्यावे लागतील. या आवश्यकतांमुळेच विदेशी चलनाची विक्री आणि देवाणघेवाण जिथे होते तिथेच विदेशी मुद्रा व्यापार सुरू होतो. आणि जिथे एखादी व्यक्ती भारतीय रुपये देऊन US डॉलर मिळवते, त्याला एक्सचेंज म्हणतात. या परिस्थितीत, यूएस डॉलर्स या एक्सचेंजद्वारे परकीय चलन बाजारातून विकत घेतले जातात. या परकीय चलनाच्या व्यापाराला सोप्या भाषेत फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात.

हेही वाचा.. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मध्ये पुन्हा वाढ. जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेल दर

फॉरेक्स ट्रेडिंग कसे कार्य करते?

फॉरेक्स ट्रेडिंग हे इक्विटी ट्रेडिंग प्रमाणेच आहे, फरक एवढाच आहे की इक्विटी ट्रेडिंगमध्ये शेअर्सची किंमत फायदा किंवा तोट्यात निर्णायक भूमिका बजावत असते. तर, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये, विनिमय दर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. फॉरेक्स ट्रेडिंगमधून कमाई करण्यासाठी, एखादी व्यक्ती त्याच्या अपेक्षा आणि ज्ञानानुसार कोणतेही चलन खरेदी करू शकते. 

उदाहरणार्थ:

समजा एखादी व्यक्तीला डॉलरच्या वाढत्या किमतीचा फायदा घ्यायचा आहे कारण डॉलर आज रु.70 वर व्यवहार करत आहे. त्या व्यक्तिला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारावर असे वाटते की तीन महिन्यांत ते रु.73 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या परिस्थितीत कोणीही USD खरेदी करू शकतो आणि तीन महिन्यांनंतर रु.73 वर पोहोचल्यावर तो विकू शकतो. अशा प्रकारे ती व्यक्ती प्रत्येक $1000 वर $3000 पर्यंत कमवू शकतो.


भारतात फॉरेक्स ट्रेडिंग कसे सुरू करावे ? 

भारतामधे फॉरेक्स ट्रेडिंग ( Forex trading ) हे विविध कारणांमुळे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. जसे की मोठा नफा मिळविण्यासाठी प्रक्रियेत मोठी गुंतवणूक आवश्यक आहे. आणि भारतात अशा प्रकारचे काम करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे की ते बेकायदेशीर आहे याबद्दल लोक अनेकदा गोंधळलेले असतात. त्यामुळें भारतीय रिझर्व्ह बँकेने ( RBI ) निर्धारित केलेल्या नियम व अटी स्पष्ट करणे गरजेचे आहे.

फॉरेक्स ट्रेडिंग हे केवळ सेबी नोंदणीकृत ब्रोकरद्वारेच केली जाऊ शकते. ज्या व्यक्तीला फॉरेक्स ट्रेडिंग करायचे आहे त्याचे फॉरेक्स ब्रोकरकडे खाते असणे आवश्यक आहे


भारतीय एक्सचेंज मध्ये BSE, NSE, MCX-SX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) इत्यादींवर ठराविक जोडी मध्येवफॉरेक्सला कायदेशीर परवानगी आहे. भारतात फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी फक्त नोंदणीकृत फॉरेक्स ब्रोकरकडे खाते उघडणे आवश्यक आहे. आणि या खात्याद्वारे आपण फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतो.

हेही वाचा.. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना विनातारण ५ ते २५ लाख  कर्ज असा करा अर्ज

यशस्वी फॉरेक्स ट्रेडिंगसाठी काही टिप्स

 फॉरेक्स ट्रेडिंग हे इक्विटी ट्रेडिंग म्हणजेच शेअर मार्केटच्या ( Stock Market)धर्तीवरच कार्य करते. शेअर बाजारातील शेअरची किंमत जिथे नफा-तोटा ठरवते, तिथे तीच विनिमय किंमत असते. म्हणून फॉरेक्स ट्रेडिंग करतो त्यालाच फायदा होईलच असे नाही, कदाचित त्याचे नुकसानही होईल. 

१. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्हाला बाजाराचे योग्य ज्ञान आणि पुरेसा अनुभव असल्याची खात्री करा.

२. फॉरेक्स ट्रेडिंग हे दिवसाचे 24 तास, आठवड्याचे पाच दिवस खुले असते, परंतु भारतात बाजार संध्याकाळी 5 वाजता बंद होतो. त्यामुळे इंट्राडेचा पर्याय निवडला पाहिजे.

३. घोटाळ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. अशा प्रकारची ट्रेडिंग फक्त नोंदणीकृत फॉरेक्स ब्रोकरद्वारेच करा.

४. प्रत्येक ट्रेडसाठी स्टॉप लॉस सेट करा अन्यथा मोठा तोटा होऊ होऊ शकते.

५. फॉरेक्स ट्रेडिंग करण्यापूर्वी, एक ट्रेडिंग प्लॅन बनवा आणि नेहमी त्याचे अनुसरण करा.

६. नेहमी तुमच्या भावनांना ट्रेडिंग पासून वेगळे ठेवा कारण भावनांमुळे तुम्हाला अव्यवहार्य निर्णय घेण्यास प्रवृत्त केले जाते.

७. हे लक्षात ठेवा की तुमचे नुकसान भरून काढण्यासाठी ट्रेडिंग करू नका, परंतु जेव्हा तुम्हाला वाटते की ते तुमच्यासाठी योग्य आहे तेव्हाच ट्रेडिंग करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या