नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे. यासाठी २०२३-२४ वर्षांमध्ये ६,९०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत २००० रुपयाचे ३ हफ्ते मिळतात, त्याच सोबत आता अजून २००० रुपयांची वाढ होऊन एकूण ४००० रुपयांचा हफ्ता वर्षातून ३ वेळा बँक खात्यामध्ये जमा होईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पात्रता काय आहे
१) प्रधानमंत्री किसान सन्मान ( PM Kisan yojana) निधी योजनेमध्ये पात्र असलेले सर्व शेतकरी
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतील.
२) या योजनेसाठी पात्र शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करावा
राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्याची कोणतीही प्रक्रिया अजूनपर्यंत सांगण्यात आली नाही. कदाचित किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकर्यांची माहिती शासनामार्फत घेऊन त्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना निधी वाटप केला जाईल. परंतू अजून निधी वाटपाबाबत कोणतीही आधिकृत माहिती शासनाने जाहीर केली नाही, योजानेबद्दल माहिती प्रसिद्ध झाल्यास माहिती देण्यास येईल.
.jpeg)
0 टिप्पण्या