Hot Posts

6/recent/ticker-posts

स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवा म्हणजे काय?

स्टारलिंक इंटरनेट सेवा म्हणजे काय? भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा कधी सुरू होईल
Starlink Satellite Internet : आज आम्ही लेखात तुम्हाला सद्द्या ट्रेण्ड मध्ये सगळीकडे चर्चेचा विषय असलेल्या स्टारलिंक इंटरनेट ( Starlink Internet information in Marathi ) बद्दल माहीती देणार आहोत. Starlink म्हणजे काय, Starlink कसे काम करते, त्याची गती काय आहे आणि Starlink भारतात कधी येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील. चला तर मग जाणून घेऊया स्टारलिंकशी संबंधित संपूर्ण माहिती या लेखात तुम्हाला मिळणारं आहे.

स्टारलिंक इंटरनेट (Starlink Internet) म्हणजे काय?

 इलॉन मस्कने इंटरनेट सेवा पुरवण्याचा एक वैशिषट्यपूर्ण मार्ग शोधून काढला आहे ज्याची सद्ध्या सगळीकडे खुप चर्चा होत आहे. स्टारलिंक इंटरनेट हा उपग्रहाद्वारे थेट लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याचा एक मार्ग आहे. ही पद्धत नवीन नाही, परंतु इलॉन मस्कने ज्या पद्धतीने हे नियोजन केले ते वेगळे आहे, जे भविष्यात इंटरनेट वापरकर्त्याचा इंटरनेट वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल. सध्या बहुतांश ठिकाणी फायबर ऑप्टिक्सद्वारे इंटरनेट सेवा पुरविली जाते. फायबर ऑप्टिक्स हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये डेटा लाईट मधून पाठवला जातो, परंतु स्टारलिंक यापेक्षा खूप वेगळे आहे. स्टारलिंक हे SpaceX द्वारे संचालित उपग्रह इंटरनेट समूह आहे.

यामध्ये सर्व उपग्रह इतर दळणवळण उपग्रहांपेक्षा कमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरतात आणि संपूर्ण पृथ्वीवरील त्यांच्या ग्राहकांना थेट इंटरनेट सेवा पुरवतात.

अमेरिकेच्या SpaceX कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. स्टारलिंकचे नेटवर्क सेट करण्यासाठी, कंपनीने 2018 पासून स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत, स्टारलिंक ने पृथ्वीच्या कक्षेत 1700 पेक्षा जास्त उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केले गेले आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात स्टारलिंकद्वारे इंटरनेट पोहोचवणे हे इलॉन मस्कचे ध्येय आहे. कारण अजूनही जगाच्या अनेक भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचलेली नाही. यासाठी इलॉन मस्क यांना अंतराळात 12000 उपग्रह स्थापित करायचे आहेत.

पारंपारिक उपग्रहांपेक्षा स्टारलिंक उपग्रह हे पृथ्वीच्या 60 पट जवळ असतील. या कारणास्तव, वापरकर्त्याला कमी लेटन्सीसह इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळे डेटा पोहोचण्यासाठी खूप कमी वेळ लागेल. इलॉन मस्कच्या मते, स्टारलिंकची सेवा फायबर ऑप्टिक्सपेक्षा 40 पट वेगवान असेल.


स्टारलिंक इंटरनेट ( Starlink Internet) कसे कार्य करते?

जास्त विलंबामुळे सॅटेलाइट इंटरनेट चांगले मानले जात नाही. म्हणून, कमी विलंबाने डेटा वितरीत करण्यासाठी, स्टारलिंक उपग्रह परंपरागत उपग्रहांपेक्षा कमी कक्षेत स्थापित केले गेले आहेत, जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 550 किलोमीटर उंचीवर फिरतात. यामुळेच, स्टारलिंक व्हिडिओ कॉल आणि ऑनलाइन गेमसाठी खूप फायदेशीर असेल, जे इतर उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवा देणाऱ्यांना आव्हान देतील.

कमी परिभ्रमण स्थितीमुळे, स्टारलिंक उपग्रह रात्री अधिक चमकतात, कारण ते आपल्या अगदी जवळ असतात. 

त्याच्या फाल्कन ९ ( Falcon 9 )प्रक्षेपणच्या मदतीने, स्पेसएक्स कंपनी सुरुवातीला पार्किंग कक्षेमध्ये एका वेळी 60 स्टारलिंक उपग्रह स्थापित केले होते. ज्यांची उंची पृथ्वीपासून सुमारे 440 किमी आहे. येथून प्रत्येक उपग्रह आपले सौर पॅनेल पसरवेल आणि त्यानंतर सर्व उपग्रह पृथ्वीभोवती पसरू लागतील

प्रत्येक उपग्रह त्याच्या थ्रस्टरचा वापर करून, तो अंतिम कक्षेत फिरण्यासाठी निश्चित केलेली सर्वोच्च उंची गाठू शकेल, जी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) च्या कक्षेपासून १६० किमी वर आहे. जसजसे उपग्रह वरच्या दिशेने जातील तसतसे त्यांचा प्रकाश मंद होत जाईल.

पूर्वीचे दळणवळण उपग्रह, जसे की टीव्ही सिग्नलसाठी वापरले जाणारे उपग्रह उच्च कक्षेत स्थापित केले जायचे याचे कारण असे की उपग्रह पृथ्वीपासून जितका दूर असेल तितके जास्त भौगोलिक क्षेत्र ज्यामध्ये उपग्रह डिश सेवा पाहू शकत होते. पण स्टारलिंक जवळ परिभ्रमण करेल, त्यामुळे स्टारलिंक नेटवर्कला एकाच वेळी जगामध्ये कव्हरेज देण्यासाठी हजारो उपग्रहांची आवश्यकता असेल.

स्टारलिंक स्पेसक्राफ्ट हे पारंपरिक उपग्रहांपेक्षा लहान आणि हलके आहेत त्यांचे वजन सुमारे 250 किलो आहे. काही लोक त्यांना फ्लाइंग राउटर असेही म्हणतात. यामुळेच स्टारलिंक सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना जमिनीवर अँटेना (डिश) बसविणे आवश्यक आहे.

या अँटेनाला वीज पुरवठा होताच तो लगेच आकाश स्कॅन करेल आणि जवळच्या स्टारलिंक उपग्रहाशी संपर्क स्थापित करेल. यानंतर तो प्रत्येक जवळच्या उपग्रहाशी संपर्क ठेवेल.

वापरकर्त्याने कनेक्शनसाठी नोंदणी केल्यावर, त्याला स्टारलिंक किट प्रदान केले जाईल, ज्यामध्ये खालील उपकरणे समाविष्ट आहेत.

स्टारलिंक डिश (अँटेना)

माउंटिंग ट्रायपॉड

वाय-फाय राउटर

केबल्स

याशिवाय, स्टारलिंक इन्स्टॉलेशनसाठी योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी, वापरकर्त्याला स्टारलिंक अॅप वापरावे लागेल, जे Google Play Store आणि Apple App Store या दोन्हींवर उपलब्ध आहे.


स्टारलिंक स्थापित करण्यापूर्वी ह्या गोष्टीवर लक्ष द्या

स्टारलिंक च्या प्रत्येक सॅटेलाइट डिशला जमिनीच्या एका ठराविक ठिकाणावर स्थापित करावे लागेल जेनेंकारून ते उपग्रहाशी कनेक्ट होऊन व्यवस्थित काम करेल. या ठिकाणाला कंपनी सेल म्हणतात. जर डिश स्थापित केलेल्या सेलच्या बाहेर असेल तर डिशला इंटरनेट देण्यासाठी इतर कोणताही उपग्रह कनेक्ट होणार नाही, यामुळे वापरकर्त्याला इंटरनेट सेवा मिळू शकणार नाही. म्हणून वापरकर्त्याला स्टारलिंकला योग्य पत्ता देण्याचा सल्ला दिला जातो. जर वापरकर्त्याने सॅटेलाइट इंटरनेटसाठी वेगळ्या ठिकाणाहून बुक केले आणि ऑर्डर दिल्यानंतर इतरत्र शिफ्ट केले, तर त्याला कंपनीच्या कस्टमर केअर टीमशी संपर्क साधावा लागेल.


स्टारलिंक इंटरनेटचा वेग किती आहे?

स्टारलिंक कोणत्याही उपग्रह आधारीत इंटरनेट सेवा देणाऱ्याच्या तुलनेत 150 Mbps पर्यंत जलद आणि कमाल गतीने सेवा पुरवू शकते. Viasat या सर्वात महागड्या प्लॅनमध्ये 100 Mbps पर्यंत आणि HughesNet या प्लान मध्ये 25 Mbps पर्यंत कमाल स्पीड ऑफर केली आहे. इलॉन मस्कचा दावा आहे की स्टारलिंक लवकरच 300 Mbps गती प्राप्त करण्यास सक्षम असेल


स्टारलिंक इंटरनेट सेवा सध्या कुठे आहे?

सध्या स्टारलिंक बीटा टप्प्यात आहे म्हणजेच चाचणी चालू आहे आणि ती फक्त यूएस, कॅनडा आणि यूकेच्या काही भागांमध्ये उपलब्ध आहे. अमेरिका आणि इतर देशांसह, 10 हजार लोक स्टारलिंक इंटरनेट वापरत आहेत. 2021 मध्ये 5 ​​लाख लोकांनी या सेवेसाठी अर्ज केले आहेत. इलॉन मस्कच्या मते, स्टारलिंक 2022 पर्यंत जगभरात उपलब्ध होईल.


स्टारलिंक इंटरनेटची किंमत किती आहे?

यूएस मध्ये, SpaceX सध्या स्टारलिंक किटसाठी $499 आणि त्यानंतर दरमहा $99 आकारत आहे. जर ते भारतीय किंमतीत रूपांतरित केले तर, स्टारलिंक किटसाठी सुमारे 37400 रुपये आणि त्यानंतर दरमहा सुमारे 7400 रुपये मोजावे लागतील. ही फक्त मूळ किंमत आहे. जी कर आणि सरकारी शुल्काशिवाय आहे.

स्टारलिंकचे भारताचे डायरेक्टर संजय भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, भारतात स्टारलिंकसाठी, वापरकर्त्याला पहिल्या वर्षी सुमारे 1,58,000 रुपये द्यावे लागतील. दुसऱ्या वर्षी, खर्च सुमारे 1,15,000 असेल, कारण स्टारलिंक किट फक्त एकदाच भरावे लागेल. ही किंमत 30% करासह असेल.



खराब हवामानात Starlink काम करेल का?

स्टारलिंकला इंटरनेट प्रदान करण्यासाठी स्वच्छ हवामान आवश्यक आहे. मुसळधार पाऊस आणि वादळ यामुळे कनेक्शनमध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे इंटरनेटची गती कमी होईल किंवा तात्पुरते आउटेज होईल. दुसरीकडे, बर्फाळ प्रदेशात स्टारलिंक डिशवर बर्फ जमा झाल्यामुळे डिशसाठी समस्या आणि अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच कंपनी बर्फ पडणार नाही अशा ठिकाणी डिश ठेवण्याचा सल्ला देते. याव्यतिरिक्त स्टारलिंक डिश यूएस नॅशनल इलेक्ट्रिकल कोड (NEC) ग्राउंडिंग आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे आणि त्यामुळे विजेचे संरक्षण ही आवश्यक तरतूद आहे. 


स्टारलिंक इंटरनेट भारतात कधी येणार?

स्टारलिंक भारतात प्रवेश करण्यास तयार आहे, परंतु भारत सरकारने अद्याप त्यांना सेवा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. 2023 च्या अखेरीस स्टारलिंकच्या सेवा भारतातही उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.


स्टारलिंक कधी आणि कोणी सुरू केली?

स्टारलिंकची सुरुवात इलॉन मस्क यांनी २०१५ मध्ये केली होती. स्टारलिंकच्या उत्पादक कंपनीचे नाव Space X आहे. पहिले उपग्रह प्रक्षेपण 22 फेब्रुवारी 2018 रोजी झाले आणि 2021 पर्यंत 1700 पेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत. Starlink ची अधिकृत वेबसाइट Starlink.com आहे.

स्टारलिंकचे फायदे काय आहेत?

ही सेवा पारंपारिक उपग्रहांपेक्षा वेगवान सेवा आहे जी 150 एमबीपीएस डेटा गती प्रदान करते.

इतर सॅटेलाइट इंटरनेटच्या तुलनेत हे स्वस्त आहे.

सध्या स्टारलिंकमध्ये कोणतीही डेटा मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही अमर्यादित डेटा वापरू शकता.

हे पारंपारिक उपग्रह इंटरनेटपेक्षा कमी वेळात सेवा पुरवते.

तुम्ही कुठेही राहता तरीही स्टारलिंक जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असेल.

स्टारलिंक स्थापित करणे खूप सोपे आहे. कंपनीने दिलेले किट तुम्ही स्वतः बसवू शकता.

पाऊस, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर ते लगेच पूर्ववत होते. कारण त्यात कोणत्याही केबलला इजा होण्याचा धोका नाही.

केबल्स नसल्यामुळे, ते सहजपणे वाहून नेले जाऊ शकते आणि कुठेही सेट केले जाऊ शकते.


धन्यवाद..


स्टारलिंकचे तोटे काय आहेत?

खराब हवामानात स्टारलिंक वापरताना अडचणी उद्भवू शकतात आणि पाऊस किंवा वादळाच्या परिस्थितीत तुम्हाला स्टारलिंक वापरता येणार नाही.

स्टारलिंक वापरताना तुम्ही तुमचे डिव्हाइस (फोन किंवा लॅपटॉप) कुठेही नेऊ शकत नाही. स्टारलिंक डिश पोर्टेबल नसल्यामुळे ती एकाच ठिकाणी निश्चित करावा लागते.

हार्डवेअर इंस्टॉलेशन तुम्हाला स्वतः करावे लागेल. म्हणजे हार्डवेअर इन्स्टॉलेशन सर्व्हिस कंपनीने पुरवलेली नाही, त्यामुळे तुम्हाला ती इन्स्टॉल करण्यात अडचण येऊ शकते.

स्टारलिंकच्या उपग्रहांची संख्या एका वेळी विशिष्ट ठिकाणी निश्चित केली जाते. त्यामुळे, त्या विशिष्ट ठिकाणी, सर्व वापरकर्ते समान बँडविड्थ वापरत असतात, ज्यामुळे लोकसंख्या जास्त असलेल्या शहरी भागात स्टारलिंकचा वेग कमी होऊ शकतो.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या