तासगांव तालुक्यामध्ये गायीचा ३-५ fat व ८-५ SNF साठी ३५ रुपये दर दिला जातो व कवठे महांकाळ व जत तालुक्यात ३-५ FAT व ८-५ SNF साठी ३२ रुपये दर मिळत आहे. याबाबत आम्ही काही दूध संकलन केंद्र चालकाना विचारल्यास ते चीलिंग प्लांट सेंटर वाल्याने जो दर दिला आहे तोच आम्ही दिला आहे असे सांगत आहेत. एका चिलींग प्लांट वाल्याचे उत्तर पण असेच आले की चितळे डेअरी आम्हाला तासगांव साठी वेगळा जत व कवठे महांकाळ साठी वेगळा दर देते. चितळे डेअरीत फोन वरून चौकशी केली असता चितळे चितळे डेअरी च्या अधिकऱ्यानी कवठे-महांकाळ व जत ला दर कमी देत असल्याचे मान्य केले.
हेही वाचा.. मीशो वर घरबसल्या काम करुन मिळवा 50 हजार रुपये महिना
चितळे डेअरी तासगांव तालुक्याला वेगळा दर व कवठे महांकाळ व जत ला वेगळा दर देत असेल तर चितळे डेअरी दूध विक्री करताना कवठे महांकाळ व जत तालुक्यातील ३ रुपये कमी दराने खरेदी केलेले दूध पुढे कमी दराने विकते का? मग जत व कवठे महांकाळ मधील शेतकऱ्यांची पिळवणूक का होत आहे यावर चितळे समूहाने उत्तर देणे गरजेचे आहे. हेही वाचा.. मराठा समाजासाठी बिनव्याजी 15 लाख रुपये कर्ज
खरं आज प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक होत असताना तसेच कोरोना मध्ये अनेकांची नोकरी गेली, अनेकांचे व्यवसाय बंद झाले, अश्या अनेक संकटांनी ग्रासलेल्या शेतकरी, सामान्य शेतमजूर, अश्या अनेक घटकांनी उचल घेऊन, कोणी कर्ज काढून गायी घेऊन दूध व्यवसाय चालू केला पण त्यामध्ये सुद्धा सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम विश्वासार्हता आलेल्या चितळे डेअरी कडून जाणीवपूर्वक केलं जातंय हे दुर्दैव आहे. हेही वाचा.. शरद पवार ग्राम समृद्धी गाय गोठा योजना
टीप- पूर्णपणे पुरावे, शेतकऱ्यांची भेट घेऊन दोन तालुक्यातील बिले गोळा करून ही पोस्ट केलेली आहे.
.jpeg)
0 टिप्पण्या